दिवाळीच्या पूर्वी FSSAI ने संपूर्ण देशामध्ये कारवाई करत बनावट पवीर, खवा आणि पदार्थावर छापा घातला आहे (फोटो - एक्स)
FSSAI Action in India: नवी दिल्ली : संपूर्ण देशामध्ये दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई खरेदी- विक्री केली जाते. दिवाळीसाठी संपूर्ण बाजारपेठा सजल्या आहेत. दिवे, आकाशकंदील आणि मिठाईं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. मात्र तुम्ही घेत असलेली मिठाई ही शुद्ध आहे की बनावट आहे याची खात्री नक्की करुन घ्या. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर भेसळयुक्त पदार्थ तयार करण्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
देशातील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभाग देखील सक्रिय झाला आहे. दिल्ली, गोरखपूर, गाझियाबाद, चंदौली, बागेश्वर, अलवर आणि मुझफ्फरनगरसह अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी, बनावट आणि भेसळ असलेले अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. उत्सव काळात जनतेला सुरक्षित आणि स्वच्छ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. बेकायदेशीर आणि बनावट अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने अलर्ट जारी केला आहे आणि दुकाने आणि गोदामांची तपासणी तीव्र केली आहे. अशा उपाययोजनांमुळे उत्सवादरम्यान सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घेणयाचे आवाहन केले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये, दिवाळी आणि छठ सणांपूर्वी छापा टाकत अन्न विभागाने मोठी कारवाई केली. नौसाध येथील एका खाजगी बस स्टॉपवर छापा टाकण्यात आला आणि सुमारे ५०० किलो संशयास्पद खजूर आणि १५ क्विंटल मिठाई आणि नाश्ता जप्त करण्यात आला. हे पदार्थ खाजगी बस आणि डिलिव्हरी व्हॅनमधून दिल्लीहून गोरखपूरला आणले जात होते. अन्न विभागाच्या पथकाने घटनास्थळी तीन व्यक्तींकडून नमुने गोळा केले आणि माल नष्ट केला. इतर वस्तू, ज्यांची किंमत अंदाजे ३ लाख रुपये आहे, हा बनावट आणि निकृष्ट दर्जाचा माल जप्त करण्यात आल्या. गोरखपूरचे सहाय्यक अन्न आयुक्त डॉ. सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले की जप्त केलेल्या खजूर कंटेनरमध्ये FSSAI क्रमांक आणि उत्पादन तारखा नव्हत्या. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की खजूरांमध्ये मानवी आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ असू शकतात. नमुने प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत.
#UttarPradesh BIG Action on Adulteration in Prayagraj!
Illegal dairy in Jasra shut down by the Food Safety & Drug Administration. Hundreds of kgs of paneer and liters of milk destroyed on the spot. 4 samples sent for testing. #FSSAIinStates #FSSAIAction pic.twitter.com/TKySyRaXd8 — FSSAI (@fssaiindia) October 16, 2025
त्याचबरोबर FSSAI ने उत्तरप्रदेशमधील संभळमधील चीज कारखान्यावर छापा टाकला. अन्न सुरक्षा विभागाने संभळमधील एक परवाना नसलेला चीज कारखाना बंद केला आहे. चीज आणि दुधाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. तसेच निकृष्ट दर्जाचे दूध हे नदीनाल्यामध्ये फेकून देण्यात आले. दूधाचे कॅन पूर्णपणे नाल्यात फेकून देण्यात आले आहे. तसेच पनीर देखील नष्ट करण्यात आले. तसेच मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई केली. दुग्धशाळा आणि मिठाईच्या दुकानांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये परवाना नसलेले आणि अविश्वसनीय लेबलिंगसह व्यापक अनियमितता उघडकीस आल्याने FSSAI भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नांवर कठोर कारवाई केली आहे.
Pan-India action,One Mission: Safe Food.
FSSAI and State Food Safety teams are actively engaged in massive, coordinated raids nationwide.
Unsafe food products are being seized and destroyed in various states.
The mission is clear: Safe Food for all.#FSSAIAction #FSSAIinStates pic.twitter.com/y953cxtvMs — FSSAI (@fssaiindia) October 16, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच दक्षिण गोव्यात FSSAI ची कारवाई करत अंमलबजावणी मोहिमेत खालील गोष्टी घडल्या. लेबल नसलेले/अयोग्यरित्या साठवलेले ३४० किलो मिठाई नष्ट करण्यात आली. अस्वच्छतेसाठी एका जागेला दंड ठोठावण्यात आला आणि चाचणीसाठी १६ नमुने घेण्यात आले. अलीगढमध्ये, तपासणी आणि अंमलबजावणी कारवाई दरम्यान १७ लाख ३७ हजार रुपयांचे १९,५०० किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. नमुने घेण्यात आले आणि एफआयआर नोंदवण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी अक्षरशः त्या दुधामध्ये हात धुतले.
#NoToAdulteration ये तस्वीर है मिलावटी दूध के नष्ट करने की … #UttarPradesh #UPFDA ने अलीगढ़ में निरीक्षण और प्रवर्तन की कार्रवाई में ₹17,37,000 मूल्य का 19500 किलो मिलावटी खाद्य पदार्थ मौके पर नष्ट किया गया । सैंपल लेकर, एफआईआर दर्ज कराई गई है। #FSSAIinStates #FSSAIAction pic.twitter.com/PYBeNlcWSx — FSSAI (@fssaiindia) October 17, 2025