उत्तर प्रदेशात तरूणीवर सामूहिक अत्याचार; अत्याचाराचा व्हिडिओही बनवला अन्…

राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नेले असता पोलिस तिला टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.

    लखनौ : राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नेले असता पोलिस तिला टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनुसार, पोलिसांनी पाच दिवसांनंतर या प्रकरणी एफआयआर नोंदवला. सत्यम, शोएब आणि अस्लम अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (दि.5) घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी किंग जॉर्ज मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. यावेळी बाहेर चहाच्या टपरीवर सत्यमशी तिची ओळख झाली. मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने आरोपी व त्याच्या साथीदारांनी मुलीला गाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी तिला पॉलिटेक्निक चौकात सोडून दिले. केजीएमयू रुग्णालयासमोर ही घटना घडली.

    दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सूत्रांनुसार, पीडित तरुणी शहरातील एका मोठ्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तीन आरोपींपैकी एक खासगी रुग्णवाहिका चालक तर दोन आरोपी मेडिकल कॉलेजजवळ चहाची टपरी लावतात. आरोपींनी सामूहिक अत्याचारादरम्यान पीडितेचा व्हिडिओही बनवला होता. पीडितेने रडत रडत घरी पोहोचून संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ सुरूच ठेवली.