अयोध्या : अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून भेटवस्तू येत आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतूनही राम मंदिरासाठी विशेष भेट आली आहे. नेपाळ म्हणजेच जनकपूर देवी सीता मातेची जन्मभूमी आहे. नेपाळमधून भगवान रामसाठी तीन हजारांपेक्षा जास्त भेटवस्तू आल्या आहेत. त्यात चांदीचे बूट, विविध प्रकाराचे दागिने, कपडे यांचा समावेश आहे. जनकपूरवरून तीन वाहनांच्या ताफ्यातून या भेटवस्तू येत आहेत.
प्रभू श्रीरामासाठी बनवला 1100 किलोचा दिवा : सोशल मीडियावर राम मंदिरातील आणि त्या संबंधीत फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक जण उत्सूक आहेत. अनेक लोक त्या दिवशी अयोद्धेत आणि आपआपल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्या दिवशी जल्लोष साजरा केला जाणार आहे. रामभक्त अनेक प्रकारे हा दिवस साजरा करताना दिसून येणार आहे. अशातच वडोदराचे रामभक्त अरविंदभाई पटेल यांनी रामललासाठी 1100 किलोचा दिवा बनवला आहे.
विविध भेटवस्तू
गुजरातमधील वडोदरा येथून 108 फूट लांब अगरबत्ती येत आहे. सहा महिन्यांपासून ही अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरु होते. या अगरबत्तीचे वजन 3.610 किलोग्रॅम आहे. 3.5 फूट रुंद ही अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती दीड महिन्यापर्यंत चालणार आहे. अगरबत्तीचा सुंगध अनेक किलोमीटर लांब जाणार आहे. ही अगरबत्ती करण्यासाठी 376 किलो गुग्गल, 376 नारळ, 190 तूप, 1,470 गायीचे शेण, 420 जडीबुटीचा वापर केला.
गुजरातमधील दरियापूर येथून अखिल भारतीय दबगर समाजाने तयार केलेला नगाडा (मंदिराचा ढोल) येणार आहे. मंदिराच्या प्रांगणात हा नगाडा असणार आहे. त्याच्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष या नगाडाकडे जाणार आहे.
सुरतमधून सीता मातेसाठी केलेली विशेष साडी येत आहे. या साडीवर भगवान राम आणि अयोध्येतील मंदिराची प्रतिमा आहे. ही साडी तयार करण्यासाठी 5,000 अमेरिकी डायमंड आणि 2 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे.