एकतर्फी प्रेमातून तरुणीचा चाकूने भोसकून खून; पहाटे तरूणीच्या घरात घुसला अन्…

एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या एकाने तरुणीच्या घरात घुसून तिचा (Murder of A Young Girl) खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना हुबळीतील वीरपुरा गुढी परिसरात बुधवारी पहाटे घडली.

    बंगळुरू : एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या एकाने तरुणीच्या घरात घुसून तिचा (Murder of A Young Girl) खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना हुबळीतील वीरपुरा गुढी परिसरात बुधवारी पहाटे घडली.

    अंजली अंबिगेरा (वय 20) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, विश्वा (वय 21) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेंडीगेरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वीरपूर गुडी इथं तरुणीवर चाकू हल्ला झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील हत्येचे कारण तपासले जाईल. हे प्रेम प्रकरण आहे का याचा तपास केला जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तपासानंतर या प्रकरणातील पुढील माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

    आरोपी विश्वा हा गेल्या अनेक दिवसांपासून अंजलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, अंजली त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे विश्वा हा संतापला होता. बुधवारी पहाटे तरुणी घरात झोपलेली असताना विश्वा तिच्या घरात घुसला. यावेळी त्यानं तरुणीच्या घरच्यांशी वाद घातला. त्यानंतर विश्वानं तरुणीवर चाकूने वार करुन तिचा निर्घृण खून केला.