Iran Kuwait Tension : कुवैतच्या 'त्या' कारवाईने इराण संतप्त; भारताच्या दौऱ्यावर असातानच अराघची यांनी दिला कडक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मंगळवारी (१२ मे) कुवैतने दावा केला होता की, त्यांच्या समुद्री हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक केली आहे. कुवैतने दिलेल्या माहितीनुसार, हे ४ही संशयित इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) शी संबंधित आहेत. त्यांनी चीनद्वारे विकसित केल्या जाणाऱ्या बंदराजवळ घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मात्र इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी कुवैतचे सर्व आरोप फेटाळले. भारतात येताच च्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, कुवैतने जाणीवपूर्वक आमच्या निष्पाप नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ज्या बेटावरुन अमेरिकेने आमच्यावर हल्ले केले, त्याच ठिकाणी ही कारवाई होणे संशयास्पद असल्याचे अराघची यांनी म्हटले.
अराघची यांनी कुवैतला कडक शब्दात सुनावले. तसेच त्यांनी ताब्यात घेतलेल्या ४ इराणी नागरिकांना कोणत्याही अटीशिवाय सोडण्याचा इशारा दिला. याशिवाय कुवैतने घुसखोरी आणि शस्त्रास्त्र बाळगण्याचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. इराणला त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
अराघची यांचा भारत दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात प्रचंड अस्थिरता पसरली आहे. याशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर उर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
In clear attempt to sow discord, Kuwait has unlawfully attacked an Iranian boat and detained 4 of our citizens in the Persian Gulf. This illegal act took place near island used by the U.S. to attack Iran. We demand immediate release of our nationals and reserve right to respond. — Seyed Abbas Araghchi (@araghchi) May 13, 2026
१४ ते १५ मे रोज नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच वेळी दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड चीनच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकांकडे लागले आहे. या बैठकांमुळे राजनैतिक स्तरावर बदल होण्याची शक्यता आहे.






