File Photo : Jharkhand Raj Bhawan
रांची : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यात आली होती. त्यानुसार, या दोन्ही राज्यांतील निकाल आता समोर आले आहे. त्यात झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या पक्षाला बहुमत मिळाले असून, त्यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज घेतला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तब्बल 4 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.
हेदेखील वाचा : Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द हटवले जाणार नाहीत
हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी मोर्हाबादी मैदानावर तयारी पूर्ण झाली आहे. याबाबत मोहाबडी मैदानावर सुरक्षेसह शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यातून 35 हजारांहून अधिक लोक मोर्हाबादी मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे. येथे हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान त्यांचे समर्थक राजधानीत पोहचू लागले आहेत.
शहरातील अनेक हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग सुरू झाले आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे राजकारणीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच रांची पोलीस आणि जिल्हा प्रशासन शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करत आहेत.
सुरक्षेसाठी 4000 जवान राहणार तैनात
या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 4000 जवान तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रांची विमानतळ, हॉटेल, सर्किट हाऊस, मोरहाबादी मैदान आणि मार्गावर चार हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. विशेष सैनिकांना वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
मैदानात बसण्यासाठी पाच थरांची व्यवस्था
हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मो-हाबडी मैदानात एक मोठा स्टेज बांधला जात आहे. ज्यामध्ये 50-60 लोक आरामात बसू शकतील. व्यासपीठ अत्यंत मजबूत करण्यात आले आहे. मैदानाची पाच थरांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये बसण्याची व्यवस्था असेल. ज्यांना बसायला जागा नाही त्यांना समोरून उभे राहून शपथविधी पाहता यावा यासाठी मंचासमोरील जागा पूर्णपणे मोकळी ठेवण्यात आली आहे.
अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात
शपथविधी सोहळ्यासाठी विमानतळ, हॉटेल, सर्किट हाऊस आणि मोरहाबादी मैदानावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असेल. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 10-12 व्हीव्हीआयपी पाहुणे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही पाहुणे एक दिवस आधी रांचीला पोहोचतील, त्यामुळे रांची विमानतळापासून हॉटेल्स आणि रांचीच्या सर्व सर्किट हाऊसपर्यंत सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : ‘या’ सरकारी कंपनीने पतंजली फूड्सचे 1.25 लाख शेअर्स खरेदी केले; ‘इतका’ वाढलाय हिस्सा!