नवी दिल्ली – देशात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. सणांच्या आधी, कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट XBB आणि XBB.1 आढळून आले आहेत. यामुळे कोविडचा प्रसार रोखण्यासाठी राज्ये गाइडलाइन जारी करत आहेत. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी कोविड-१९ च्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. यावेळी सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख व वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.
देशभरात मास्क आणि कोविड खबरदारीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत लवकरच नवीन व्हेरियंट शोधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मंडाविया म्हणाले, नवीन व्हेरियंटला सामोरे जाण्यासाठी प्रभावी धोरण तयार करावे लागेल. रणनीतीची योग्य अंमलबजावणी होईल हेदिखील सुनिश्चित करावे लागेल.
दुसरीकडे, ओमायक्रॉन चे BQ.१ आणि BA.२.३.२० चे सब-व्हेरियंट पुणे, महाराष्ट्रामध्ये आढळले आहे. हे BA.२.७५ आणि BJ.१ चे पुन्हा संयोजन आहे. कोविड-१९ ची वाढती प्रकरणे आणि सणासुदीच्या हंगामामुळे बीएमसीने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक अॅडव्हायझरी जारी केली आहे.