accident (फोटो सौजन्य- pinterest )
उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथील लता मंगेशकर चौकात एका वेगवान डंपरने अनेक वाहनांना टक्कर मारली. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच व्यक्ती जखमी झाले आहे. जखमींचा रुग्णालायत उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानीय लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचा वातावरण आहे.
२ कोटींसाठी जिवंत तरुणाचा तेरावा; विम्याचे पैसे हडपण्यासाठी बाप-लेकाची योजना
अयोध्येतील श्री राम रुग्णालयाचे आपत्कालीन चिकित्सक अधिकारी डॉ मनीष शक्य ने सांगितले की घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना राजा दशरथ वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे.
घटनेतील जखमीने सांगितले
लता मंगेशकर चौकात एक वेगवान डंपरने माझ्या गाडीला धडक मारली. मी आपल्या वाहनातून उडी मारून आपला जीव वाचवण्यात यशश्वी झालो. डंपरने अनेक अन्य लोकांना आणि वाहनांना धडक मारली आहे आणि एका व्यक्तीला चुरगळले. माझ्या पायांना, छातीला आणि डोक्याला मार लागला आहे.
दोन दिवसा आधी राजस्थानच्या जयपूरमध्ये एसयूवीने ९ लोकांना चुरगळले
राजस्थानच्या जयपूरमध्ये एक एसयूवी ने ९ लोकांना चुरगळले. यात ३ लोकांचा मृत्य झाला असून ६ लोक जखमी झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेच्या नंतर जयपूरमध्ये संतापलेल्या लोकांनी चक्का जाम केला आणि विरोध प्रदर्शन केलं. स्थानीय लोकांनी आरोपीच्या विरुद्धच्या कारवाईची मागणी केली आहे. ९ लोकांना चुरगाळणारा उस्मान खान काँग्रेसचे जिला उपाध्यक्ष आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी म्हटले आहे की ते आरोपींना फाशी देतील. आम्ही त्याच्या घरावर बुलडोझरही चालवू.