हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
IMD Alert To India: देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ भागात तर प्रचंड पाऊस सुरु आहे. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिल्लीला यलो अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोसाट्याचा वारा आणि विजा देखील होण्याचा अंदाज आहे. दिल्लीत आज तापमान ३४ अंश सेल्सियसपर्यंत स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेशला रेड अलर्ट
पर्वतीय राज्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर अजून वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील ६ दिवस हिमाचल प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात अती ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज आणि उद्या जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आणि घाटमाथा या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू षकळतो. तर गुजरात जोरदार पाऊस होऊ शकतो. पुढील ७ दिवस अनेक ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आजपासून १४ जुलैपर्यंत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या 29 जिल्ह्यांत होणार मुसळधार
उत्तर प्रदेश राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर पुढील दोन ते तीन याच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बिहारच्या कैमुर ते रोहतास या भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचाअंदाज आहे. 11 जुलै पर्यंत उत्तर-पश्चिम भारतात जोरदार पुस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात देखील कोसळधार
कर्नाटक, केरळ या राज्यात प्रचंड पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारेदेखील वाहण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.