देशातील अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा (फोटो- ani)
नवी दिल्ली: मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. खास करून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत तर अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे. आज आणि उदय उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दिल्लीत देखील आज पुस होण्याचा अंदाज आहे. आज दिल्ली वादळी वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो. दिल्लीत 11 जुलैपर्यंत माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर प्रदेशच्या 29 जिल्ह्यांत होणार मुसळधार
उत्तर प्रदेश राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर पुढील दोन ते तीन याच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बिहारच्या कैमुर ते रोहतास या भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचाअंदाज आहे. 11 जुलै पर्यंत उत्तर-पश्चिम भारतात जोरदार पुस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या राज्यात होणार मुसळधार
पंजाब, हरियाणा, हिमाचल, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांना बहरतीय हवामान विभागाने अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यात 11 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणेचे आवाहन सरकाने केले आहे. हरियाणा आणि पंजाबला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात देखील कोसळधार
कर्नाटक, केरळ या राज्यात प्रचंड पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारेदेखील वाहण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खबरदार! 9 जुलैपर्यंत नुसते धुमशान
भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील 2 दिवस तुफान पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पुस जोरदार बॅटिंग करणार आहे. महाराष्ट्राला 9 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Alert: खबरदार! 9 जुलैपर्यंत नुसते धुमशान; वादळी वारे अन् IMD चा अलर्ट काय? कोकणात तर…
कोकण किनारपट्टी, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. आज कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.