देशातील अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा (फोटो - ani)
नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, उत्तर भारत, दक्षिण भारत, पर्वतीय राज्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर हवामान विभागाने जाणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात. मात्र राजधानी दिल्लीत पावसानेर थोडीशी उसंत घेतल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, दिल्लीत आज पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिल्लीसह, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाब व बिहारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यात तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये गेले काही दिवस संततधार पाऊस सुरु आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार आज उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात मथुरा, आग्रा, हाथरस, सांभल यासह अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. बिहारमध्ये आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील एक आठवडा बिहारमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज अति ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. या राज्यांना ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर दक्षिण भारतात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती काय?
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि जोरदार वादळासह वादळ येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, मराठवाडा, विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही अंशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असले तरी कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.