देशभरात पावसाचा जोर वाढणार (फोटो- ani
1. देशभरात आज मुसळधार पावसाचा इशारा
2. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये सतर्कतेचे आवाहन
3. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
India Rain Update: आज देशभरात मुसळधार पावसाचा अंदज व्यक्त करण्यात अलया आहे. अनेक राज्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोर कमी देखील होऊ शकतो. दरम्यान भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा कोणता अलर्ट दिला आहे, ते जाणून घेऊयात.
भारतीय हवामान विभागाच्या अलर्टनुसार आज उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आज अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
आज राजधानी दिल्लीत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये आज पावसापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र 31 ऑगस्ट पासून 2 ते 3 सप्टेंबरपर्यंत उत्तर प्रदेशात पावसाचा जोर वाढू शकतो.
हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये कसे असणार हवामान?
गेल्या काही दिवसांपासून पर्वतीय राज्यांमध्ये प्रचंड मोठा पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले. मात्र हवामान विभगच्या इशाऱ्याने चिंता वाढली आहे. आज दोन्ही राज्यांमध्ये अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.अनेक ठिकाणी पाऊस कहर करण्याची शक्यता आहे. ढगफुटीसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना सत्र रहाण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.|
राजस्थान, छत्तीसगड ओडिशा, पूर्वेकडील राज्ये, दक्षिणकेदिल रायांमध्ये देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कसे असणार वातावरण?
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात पावसाने कहर केला आहे. कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात देखील येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. आज सकाळपासूनच पुणे शहरात काळोख पाहायला मिळत आहे. सकाळपासून पावणे शहरात हजेरी लावली आहे. त्यामुळे आज दिवसभरात पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.