भिवंडी तालुक्यातील खोणी गावात बलिप्रतिपदेच्या दिवशी आजही बळीराजाच्या शक्तीची पूजा करण्याची परंपरा कायम आहे. दिवाळीनंतर साजरा होणाऱ्या या सणाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व असून, शेतकऱ्यांचा राजा मानल्या जाणाऱ्या बळीराजाच्या शक्तीचं प्रतीक म्हणून अंबाडीचं रोप अंगणात लावलं जातं. मागील ५० वर्षांपासून ग्रामस्थ बळीराम पाटील ही परंपरा जोपासत आहेत. पहाटे लावलेलं हे अंबाडीचं रोप उपटण्यासाठी चार-पाच जण मिळून प्रयत्न करतात, तरी ते उपटले जात नाही. बळीराजाची शक्ती त्या ठिकाणी एकवटलेली असते, अशी भावना या प्रथेच्या मागे असल्याचं ग्रामस्थ सांगतात.