देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात 21 हजार 411 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 67 रुग्णांना कोरोनामुळए जीव गमावावा लागला आहे. अशी माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी 4,38,68,476 वर पोहोचली आहे. तर देशात सध्या 1,50,100 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
[read_also content=”तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंना सुरक्षा न देण्याच्या सूचना नव्हत्या : वळसे पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/there-were-no-instructions-from-the-then-chief-minister-not-to-provide-security-to-shinde-say-valse-patil-nrgm-307175.html”]
कोरोनामुळे 67 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा देशातील एकूण मृतांचा आकडा 5,25,997 वर पोहोचला आहे, एकूण संक्रमणांपैकी 0.34 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.46 टक्के नोंदवला गेला, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 618 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
[read_also content=”नात्यात जुळवून घेताना ‘या’ गोष्टींचा विचार करा https://www.navarashtra.com/lifestyle/consider-things-while-adjusting-in-a-relationship-love-tips-nrrd-307190.html”]