नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये (Automobile Industry) आगामी वर्षात अभूतपूर्व बदल होणार आहे. येत्या 5 ते 7 वर्षात भारतात इलेक्ट्रिक दुचाकीचीच (E-Bike) विक्री होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारत, इलेक्ट्रक वाहन उत्पादनात जगातील सर्वात मोठे हब होण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलला देशात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजार देशाचे नशीबच पालटणार असणार रोजगाराची लाट येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
कच्च्या तेलावरील भार कमी करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसागणिक अवाक्याबाहेर जात आहे. त्याचा संपूर्ण बाजारपेठेवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्थेवरील इंधनाचा परिणाम कमी करण्यासाठी इलेक्ट्रक वाहन उद्योगांमध्ये बुमिंग येणार आहे.
बिझनेस चेंबर फिक्कीने इलेक्ट्रक मोबॅलिटी कार्यक्रम घेतला. यात पीएमओचे सल्लागार तरुण कपूर यांनी आधुनिक युगाची इलेक्ट्रक वाहने गरज असल्याचे सांगितले. केंद्र सरकार त्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार जास्तीत जास्त इलेक्ट्रक कार, बस आणि दुचाकी रस्त्यावर आणण्याच्या तयारीत असल्यचे कपूर यांनी स्पष्ट केले. येत्या 5 ते 7 वर्षामध्ये 100 टक्के इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेऊन येण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2030 पर्यंत देशात 1 कोटी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. अहवालानुसार, 2047 पर्यंत 87 टक्के विक्री होणऱ्या नवीन वाहनं ही इलेक्ट्रिक असतील.