सौर ऊर्जा निर्मितीत भारत बनला जगातील तिसरा सर्वांत मोठा देश; जपानलाही टाकलं मागे
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून भारत हा देश विविध क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहे. त्यात सौर ऊर्जा निर्मितीतही भारताचे एक पाऊल पुढेच आहे. सौरऊर्जा उत्पादनात भारत जपानला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या मोठ्या यशानंतर भारताचा जागतिक स्तरावरील मान वाढला आहे.
केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा एजन्सी (IRENA) च्या आकडेवारीचा हवाला दिला आहे. त्यामध्ये त्यांनी माहिती दिली. भारताने १,०८,४९४ गिगावॅट तास सौरऊर्जा उत्पादन केली आहे, तर जपानने ९६,४५९ गिगावॅट तास सौरऊर्जा उत्पादन केली आहे. या आकडेवारीनुसार, भारताने जपानला मागे टाकल्याचे दिसून येत आहे. आयआरईएनए ही ऊर्जा परिवर्तनासाठी एक जागतिक संस्था आहे, जी आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. ती देशांना त्यांच्या ऊर्जा प्रक्रिया परिवर्तनात मदत करते. याशिवाय, ते तंत्रज्ञान, नवोपक्रम, धोरण, वित्त आणि गुंतवणुकीवरील डेटासह विश्लेषण देखील प्रदान करते.
🌞 इतिहास रच दिया भारत ने! 🇮🇳
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में भारत बन गया दुनिया का तीसरा सबसे बड़ा सौर ऊर्जा उत्पादक देश।
यह सिर्फ संख्या नहीं, बल्कि स्वच्छ, टिकाऊ और हरित भविष्य की दिशा में बड़ा कदम है।#IndiaInTop3Solar pic.twitter.com/QIaXvdou7S— Office of Pralhad Joshi (@PralhadJoshiOfc) July 31, 2025
केंद्रीय मंत्री जोशी यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही माहिती पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सौरऊर्जा उत्पादनात भारताने जपानला मागे टाकले आहे. भारताने १,०८,४९४ गिगावॅट तास सौरऊर्जा उत्पादन केले तर जपानचे उत्पादन ९६,४५९ गिगावॅट तास आहे. भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे, भारत जागतिक स्वच्छ ऊर्जा क्रांतीमध्ये आघाडीची भूमिका बजावत आहे, असे ते म्हणाले.
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट स्वच्छ इंधन-आधारित वीज क्षमता साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी ते बहुआयामी दृष्टिकोनाने काम करत आहे. या संदर्भात, हे यश महत्त्वाचे आहे.