भारताला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
नवी दिल्ली: देशभरात आज ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभरातील अनेक ठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने आज कोणत्या राज्याला कोणता अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.
ऑगस्टमध्ये महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकाने काळजी घेण्याचे वाहन करण्यात आले आहे. प्रशासन देखील सतर्क झाले आहे. महत्वाच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जात आहे. राजधानी दिल्लीत देखील आज पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे.
जम्मू काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व भारत, पश्चिम भारत आणि महाराष्ट्रात देखील हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार
मध्य प्रदेश, पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू राज्यात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोलीत मुसळधार पाऊस
काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांत पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना गेल्या पंधरवड्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार कायम आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
India Rain News: ‘या’ राज्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा; IMD च्या अलर्टने वाढवले टेन्शन
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
दक्षिण भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पूरस्थितीचा धोका बळावला आहे. पूरस्थितीमुळे एटापल्ली तालुक्याअंतर्गत येत असलेल्या हेटलकसा-बोलेपल्ली-एटापल्ली हा राज्यमार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. परिणामी, या मार्गावरील वाहतूक सेवा प्रभावित झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले होते. अशातच मागील २ दिवसांपासून पावसाने पुनरागमन झाले असून, जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत.