भारतीय लष्कराचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर (फोटो- bsf)
India Vs Pakistan : भारत देशात जे दहशतवादी कारवाया होतात त्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे. मात्र पाकिस्तान सतत भारताच्या कुरापती काढत असतो. काश्मीरसह भारतात दशतवादी कारवाया घडवत असतो. तसेच प्रत्यक्ष सीमा रेषेवर पाकिस्तान सीजफायरचे नियम मोडून गोळीबार करत असतो. पाकिस्तानने पुन्हा एकदा पूंच जिल्ह्यातील बालाकोट भागात भारताच्या सैन्य पोस्टवर गोळीबार केला. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. उपलब्ध माहितीनुसार पाकिस्तानचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
पाकिस्तानने सीजफायर नियम मोडून भारतीय सैन्य पोस्टवर गोळीबार केला. याला भारताच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 4 ते 5 सैनिक ठार झाल्याचे समजते आहे. पाकिस्तान सतत नियंत्रण रेषेवर गोळीबार करून भारताला त्रास देत असतो. गेले काही दिवस भारतात घुसखोरी घडवण्याच्या दृष्टीने पाकिस्तान फायरिंग करत होता. मात्र भारताने हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कोणत्याही कारणाशिवाय करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधी नियमांचे पालन केले नाही. एक दिवस आधी आखनूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे एक कॅप्टन आणि दोन जवान शहिद झाले होते. त्यामुळे भारतीय लष्कर आता अधिक सतर्क झाले आहे. नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी भारताचे सैनिक बॉर्डरवर अधिक गस्त घालत आहेत. पाकिस्तानच्या नापाक इराद्याना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचं पथक गस्त घालताना स्फोट
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात 2 जवान शहीद झाले, तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता जम्मू जिल्ह्यातील खोर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केरी बट्टल परिसरात नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला. यामध्ये तीन सैनिक जखमी झाले, ज्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे पथक गस्त घालत होते. यावेळी दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात तीन जवान जखमी झाले. माहिती मिळताच, अतिरिक्त लष्करी तुकडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. स्फोटानंतर लगेचच संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे.
हेही वाचा: Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचं पथक गस्त घालताना स्फोट; २ जवान शहीद, एक जखमी
याच्या एक दिवस आधी, सोमवारी, राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबारात एक लष्करी जवान गंभीर जखमी झाला होता. नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात एका अग्रेषित चौकीवर तैनात असलेल्या या जवानाला गोळी लागली आणि त्याला ताबडतोब लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या माहितीनुसार दुपारी २.४० वाजता नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार झाला.