भारताने (India) चीनवर (Chin) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 232 चीनी अॅप्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील 138 बेटिंग अॅप्सवरबंदी घालण्यात आली आहे. याशिवाय चीनचे कर्ज देणाऱ्या 94 लोन अॅप्सवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारतात अॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनंकप, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तात्काळ 138 बेटिंग चायनीज अॅप्स आणि 94 कर्ज देणार्या चिनी अॅप्सवर तात्काळ बंदी घालणे आणि ब्लॉक करणे सुरू केले आहे.हे सर्व चीनी अॅप्स आयटी कायद्याच्या कलम 69 चे उल्लंघन करत असल्याची पुष्टी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी याविरोधात तक्रारी केल्या होत्या. सामान्य लोकांकडून खंडणी वसूली केल्याचे बोलले जात होते. या चायनीज अॅप्सवर कारवाई करण्याचे हेही एक कारण आहे.
लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे
मिळालेल्या माहितीनुसार या बंदी घातलेल्या अॅप्समागे चिनीचा हात होता. या अॅप्सचे डायरेक्टर भारतीयांना बनवण्यात आले होते. या अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे आणि नंतर कर्जाचे व्याज तीन हजार टक्क्यांपर्यंत वाढवले जायचे.महत्त्वाचे म्हणजे,या माहितीच्या आधारे, गृह मंत्रालयाने सुमारे 6 महिन्यांपूर्वी कर्ज देणाऱ्या 28 चिनी अॅप्सचे विश्लेषण सुरू केले होते. मग असे समोर आले की कर्ज देणारे असे 94 अॅप आहेत. यापैकी काही अॅप्स ई-स्टोअरवर उपलब्ध होते आणि काही थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत होते.