File Photo : Manish Sisodia
दिल्ली: मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील (Delhi) राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत (Manish Sisodia Judicial Custody) 14 दिवसांची वाढ केल्याने आता ते 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत.
सिसोदिया यांना 22 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ईडीकडून सिसोदिया यांचा रिमांड न मिळाल्यास त्यांना पुन्हा तिहारला पाठवले जाईल. त्यामुळे आता सिसोदिया यांना किमान 3 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात तपास अद्याप सुरू असून तो महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचं सीबीआयनी सांगितलं.
दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी या प्रकरणाची तक्रार केली तेव्हा मनीष यांनी आपला फोन बदलला होता. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांच्या मोबाइल डेटा परत मिळवला होता, असे ईडीने न्यायालयाला सांगितले होते. मोबाईल आणि ईमेलमधील डेटाचे विश्लेषण सुरु असल्याची माहिती देण्यात आली.
[read_also content=”कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्नीशमन दलात कर्मचाऱ्यांची कमतरता, आमदार गणपत गायकवाड यांनी विधानसभेत केली तात्काळ भरतीची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/mla-ganpat-gaikwad-demand-about-recrutment-in-kdmc-fire-brigade-nrsr-377366.html”]
मनीष सिसोदिया यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, ईडीने माजी उपमुख्यमंत्र्यांवर कोणत्याही गुन्ह्याचा उल्लेख केलेला नाही. केंद्रीय यंत्रणेने गुन्ह्याच्या प्रक्रियेबद्दल सांगावे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीची चौकशी करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. ईडी आता सीबीआयची प्रॉक्सी एजन्सी म्हणून काम करत आहे. याशिवाय मनीष सिसोदिया यांनी न्यायालयाला सांगितले की, गेल्या 7 दिवसांच्या कोठडीत दररोज केवळ अर्धा तास त्यांची चौकशी करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.
मनीष सिसोदिया यांना 9 मार्च रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. यानंतर 10 मार्च रोजी सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने कोर्टाकडे सिसोदिया यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्र्यांना 17 मार्चपर्यंत (7 दिवस) कोठडी सुनावली होती. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने त्यांना 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती. 21 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होणार आहे.