File Photo : Strike
कोलकाता : पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कनिष्ठ डॉक्टरांचा संप सुरु होता. मात्र, आता तब्बल 40 दिवसांनंतर या डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.
हेदेखील वाचा : कोलकाता प्रकरणी ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय, अखेर डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत अनेक अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या
कोलकात्यात कनिष्ठ डॉक्टर महिनाभराहून अधिक काळ आंदोलनावर बसले होते. आंदोलनाच्या 38 व्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. घटनास्थळाशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरजी मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कनिष्ठ डॉक्टरांची होती.
यासोबतच कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल आणि अन्य दोषी अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवणे आणि रुग्णालयात सुरक्षा उपायांची खात्री करणे असा मुद्दाही डॉक्टरांनी उपस्थित केला होता. मात्र, डॉक्टरांच्या वाढत्या मागण्या आणि डॉक्टरांच्या असंतोषानंतर कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या सरकारने कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाता पोलिसांमध्ये करण्यात आले मोठे बदल
डॉक्टरांची वाढती मागणी आणि असंतोष पाहता ममता बॅनर्जी यांच्या सरकारने कोलकाता पोलिसांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. सरकारने पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना त्यांच्या पदावरून हटवले असून, त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त म्हणून मनोजकुमार वर्मा यांची नियुक्ती केली आहे. आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येविरोधात अनेक कनिष्ठ डॉक्टर आंदोलन करत असताना ममता सरकारने हा निर्णय घेतला होता.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच होणार..बाळासाहेब थोरातांचा विश्वास; खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं की…