दरवर्षी शिर्डीतल्या साईबाबा संस्थानला (Shirdi saibaba Temple) देशभरातुन मोठ्या प्रमाणावर दान करण्यात येते. प्रत्येक जण त्यांना जमेल त्या पद्धतीने दान करायचा प्रयत्न करतात. कधी पैशाच्या तर कधी दागिण्यांच्या स्वरुपात हे दान असतं. देशातील अग्रगण्य वाहन कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा सुद्धा साईबाबाचे भक्त आहेत. त्यांच्या कंपनीत उत्पादित होणारी कोणतीही पहिली गाडी साई बाबांच्या चरणी अर्पण करण्यात येते. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा त्यांनी जपली असून, या वर्षीही महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपच्या वतीने कार साईचरणी दान करण्यात आली आहे.
[read_also content=”अंजूसाठी वाट्टेल ते, भारतातही येऊन राहण्याची पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह याची तयारी, सीमा हैदर प्रमाणेच प्रेमासाठी देश सोडण्याची तयारी https://www.navarashtra.com/crime/anju-nasrullah-love-story-anju-reached-pakistan-to-meet-her-lover-nrps-436563.html”]
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाकडून 31 लाख किंमतीची XUV 700 AX7 D AT या श्रेणीतील गाडी देणगी स्वरुपात प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी दिली. शनिवार 22 जुलै रोजी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रेसिडेंट विजय नाकारा (Vijay Nakara) यांनी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांच्याकडे संबंधित गाडीची चावी सुपूर्द केली. या गाडीची महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रेसिडेंट विजय नाकारा व संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे झोनल सर्व्हीस हेड अनिल राय, संस्थानचे कार्यकारी अभियंता बी.डी. दाभाडे, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळेके आदि उपस्थित होते.
उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदीशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी साईचरणी ही कार भेट दिली आहे. त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची 14 वाहने भेट दिली आहेत. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाकडून यापूर्वी व्हायोजर, बोलेरो, स्कॉर्पिओ, झायलो, लोगान, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्टर), एक्सयूव्ही 500, एक्सयूव्ही 300, मराझो, थार असे विविध श्रेणीतील एकूण 12 चार चाकी वाहने आणि 2 दुचाकी वाहने देणगी स्वरुपात प्राप्त झालेले आहेत. आणि आता महिंद्रा एक्सयूव्ही 700 ए.एक्स 7 अेटी या श्रेणीतील जवळपास 31 लाख किंमतीची गाडी देणगी स्वरुपात दिली.