Top Marathi News Today Live : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; पिकेही झाली नष्ट
30 Oct 2025 12:10 PM (IST)
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी सर्व शेतकऱ्यांनी पूर्णपणे कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडले असून आता त्यांच्या आंदोलनाला आणखी बळकटी मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.
30 Oct 2025 12:00 PM (IST)
तेजस्वी यादव यांनी प्रत्येक घरात सरकारी नोकरी देण्याच्या निवडणूक आश्वासनावर बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "तेजस्वी पंतप्रधान मोदींसोबत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. बिहारमध्ये २.४५ कोटी घरे आहेत. ते म्हणतात की प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी दिली जाईल. भारत सरकारमध्ये ५५ मंत्री आहेत. संपूर्ण भारतात ३० लाख लोक सरकारमध्ये काम करतात. तेजस्वी म्हणतात की ते प्रत्येकी २.७५ कोटींना नोकरी देतील. बिहारचे लोक, सीमांचलचे लोक इतके भोळे नाहीत की तुम्ही येऊन त्यांना सहमती देऊ शकाल. त्याचा खर्च किती येईल? जर त्यांनी २.७५ कोटी लोकांना नोकरी दिली तर त्यांना मासिक पगार म्हणून किमान २५,००० रुपये द्यावे लागतील. त्यासाठी ८,२८,००० कोटी रुपये खर्च येतील. संपूर्ण बिहार सरकारचे बजेट दरवर्षी २ लाख कोटी रुपये आहे. पैसे झाडांवर उगवत नाहीत..." असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
30 Oct 2025 11:50 AM (IST)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या 63व्या गुरुपूजा आणि 118व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यसैनिक पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या स्मृतीस्थळी भेट देत त्यांना पुष्प वाहिले.
30 Oct 2025 11:40 AM (IST)
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "... दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांच्या निधनानंतर, काँग्रेस पक्षाने त्यांना विसरण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला भारतरत्न प्रदान करण्यात ४१ वर्षे विलंब झाला, कारण काँग्रेस पक्षाला त्यांच्याबद्दल आदर नव्हता. सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिमत्त्वासाठी संपूर्ण देशात ना समाधी बांधण्यात आली ना स्मारक बांधण्यात आले. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन केले आणि सरदार पटेल स्मारक बांधले, जे एक भव्य स्मारक आहे जे जगभरात प्रसिद्ध झाले आहे."
30 Oct 2025 11:35 AM (IST)
२५ ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भारत आणि परदेशातील लाखो भाविकांनी आरोग्य आणि समृद्धीसाठी जलाशयांमध्ये सूर्यदेवाला उपवास आणि अर्पण करून छठ पूजा साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेतला, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सारख्या राज्य नेत्यांनी १,००० हून अधिक घाटांची व्यवस्था केली. दिल्लीत, भाजप अधिकाऱ्यांनी उत्सवासाठी यमुना स्वच्छता प्रयत्नांना प्रोत्साहन दिले, परंतु आप आणि काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी त्यांच्यावर नदी प्रदूषण आणि आरोग्य धोक्यांदरम्यान फिल्टर केलेल्या पाण्याने कृत्रिम सेटअप तयार केल्याचा आरोप केला. यामुळे यमुना नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले असल्याची बाब समोर आली आहे.
30 Oct 2025 11:25 AM (IST)
एमडी ड्रग्स विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद अझर हैदरसाहब कुरेशी असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे.
30 Oct 2025 11:20 AM (IST)
एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समुदाय रस्ता रोको करणार असल्याने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील समृद्धी महामार्गावर सुमारे ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत.
#WATCH | Maharashtra: Around 800 police officers and personnel are on the Samruddhi Highway in Malegaon, Washim district, as the Banjara community is going to hold a road blockade, demanding ST reservations. pic.twitter.com/IiqrGlgtbd
— ANI (@ANI) October 30, 2025
30 Oct 2025 11:15 AM (IST)
नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत वाढली आहे. कराड बंधूंच्या चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडाने हल्ला केला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, मात्र दुकानाचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा नाशिक पोलीस कसून तपास करत आहेत.
30 Oct 2025 11:10 AM (IST)
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आक्रमक मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये रस्ता रोको आंदोलन केले. यानंतर आता सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर तोडगा न निघाल्यास रेल्वे रोको करणार असल्याचा इशारा प्रहार नेते बच्चू कडू यांनी दिला आहे.
30 Oct 2025 11:02 AM (IST)
फलटण इथं डॉक्टर महिलेच्या मूळ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव इथं हे आंदोलन सुरु आहे. ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असून या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहेत.
30 Oct 2025 11:01 AM (IST)
व्ही. शांताराम यांनी तब्बल सहा दशके चित्रपटसृष्टी गाजवली. व्ही.शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे असे होते. त्यांनी एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि अभिनेते म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि 'प्रभात फिल्म कंपनी' स्थापन केली, तसेच 'राजकमल कलामंदिर'ची स्थापना केली. 'अयोध्येचा राजा' (1932) हा प्रभातचा पहिला बोलपट, तर 'सैरंध्री' (1933) हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट होता, हे त्यांचे उल्लेखनीय काम आहे.
30 Oct 2025 11:00 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घसरण थांबली आहे. बुधवारीच्या व्यापार सत्रात सोने आणि चांदी दोन्हीही वाढले. सलग सहा व्यापार सत्रांच्या घसरणीनंतर, सोन्याने पुनरागमन केले आहे. बुधवारी, त्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे २,६०० रुपयांची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,२०,६२८ रुपयांवर पोहोचली. मंगळवारी, सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१८,०४३ रुपयांवर होती. २४ तासांत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम २,५८५ रुपयांनी वाढली आहे.
30 Oct 2025 10:50 AM (IST)
PTI च्या वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनच्या अतिशय खास आणि आदरणीय राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहोत. मला वाटते की आम्ही आधीच अनेक गोष्टींवर सहमती दर्शविली आहे आणि आम्ही आणखी काही गोष्टींवर सहमती दर्शवू. अध्यक्ष शी जिनपिंग हे एका महान देशाचे महान नेते आहेत आणि मला विश्वास आहे की आमचे दीर्घकालीन चांगले संबंध असतील. त्यांच्याशी भेटणे हा सन्मान आहे.”
30 Oct 2025 10:40 AM (IST)
उत्तरप्रदेश येथून एका पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. भररस्त्यात महिलेचा कथित स्वरूपात विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी एका कॉन्स्टेबलविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारेच कॉन्स्टेबल विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
30 Oct 2025 10:30 AM (IST)
Sacnilk.com नुसार, हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा चित्रपट “एक दीवाने की दिवानियत” ने त्याच्या प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी ₹२.७५ कोटींची कमाई केली आहे. तसेच, आयुष्मान खुराणा-रश्मिका मंदाना यांच्या “थामा” या चित्रपटाने त्याच्या नवव्या दिवशी ₹३.२५ कोटी कमावले आहेत. हे आकडे प्राथमिक आणि अंदाजे आहेत आणि या आकड्यात बदल होण्याची शक्यता आहे. या चित्रपटांच्या एकूण कमाईचा विचार करता, ‘एक दीवाने की दिवानियत’ ने एकूण ₹५२.२५ कोटी कमावले आहेत. दरम्यान, ‘थामा’ ने एकूण ₹१०४.६० कोटी कमावले आहेत. ‘थामा’ ने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर ‘एक दीवाने की दिवानियत’ ने नुकताच ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
30 Oct 2025 10:20 AM (IST)
व्हिडिओमध्ये दिसते की, थार चालक घाईघाईत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो पण तितक्यात समोरुन एक मोठा ट्रक येतो आणि याला थार कारची धडक बसते. यानंतर मागून एक आणखीन ट्रक त्यांच्या दिशेने येताना दिसतो पण ही घटना पाहून दूरच तो थांबतो. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद करण्यात आली आहे. या अपघातानंतर, आजूबाजूच्या परिसरात शांतता पसरली आहे. या अपघातामुळे थार चालकाचे चांगलेच नुकसान झाल्याची शक्यता आहे. फुटेज व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्ते पावसात जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल थार चालकाला दोष देत आहेत. दरम्यान, अपघातानंतर लोक थार चालकाबद्दल विचारणा करत आहेत. दरम्यान ही घटना कधी आणि कुठे घडून आली याची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
30 Oct 2025 10:10 AM (IST)
मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव घरकुल लाच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आलं आहे. येथील भाजप आमदार राजेश पवार यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती. नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे,आमदारांनी अचानक भेट दिली आणि हा भ्रष्टाचार उघड झालं. लाच घेतल्याचं काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी मान्य केलं होत. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे, लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
30 Oct 2025 10:01 AM (IST)
महिमा चौधरीच्या नवीन व्हिडिओमुळे तिच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. अलिकडेच सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये असे सूचित होते की वयाच्या ५२ व्या वर्षी महिमा चौधरीने पुन्हा लग्न करत आहे. ज्यात अभिनेत्री जेष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांच्यासोबत वधूच्या पोशाखात पोज देताना दिसली आहे. व्हिडिओमध्ये आणखी एक जोडपे देखील दिसत आहे. तसेच, व्हिडिओमध्ये महिमा चौधरी आणि संजय मिश्रा एकमेकांशी प्रेमाने बोलत असल्याचे दिसत आहे. त्यांना अचानक लग्नाच्या पोशाखात पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
30 Oct 2025 09:45 AM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेले वैभव खेडेकरांबरोबर भाजपात प्रवेश केलेले मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा मनसेत दाखल झाले आहेत. जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली अन्य पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले होते.
अविनाश सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, महिला पदधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकत्यांच्या मोठ्या समूहाने राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. यामुळे हा वैभव खेडेकरांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खेडेकर यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
30 Oct 2025 09:35 AM (IST)
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत तब्बल ५०० फोर्टींपेक्षा अधिक कर संकलन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. कर संकलनातील ही झेप लोकाभिमुख उपक्रम, डिजिटल पेमेंट्सला दिलेले प्रोत्साहन तसेच करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती मोहिमांमुळे तसे नागरिकांचा सहकार्यामुळे शक्य झाले महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे सांगितले आहे.
30 Oct 2025 09:23 AM (IST)
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. वडंबा शिवारात बुधवारी (दि.29) दुपारी दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे.
30 Oct 2025 09:12 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता मतदार यादी घोटाळा उघड करणार आहेत. ते या विषयावर आज सादरीकरण करतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
30 Oct 2025 09:05 AM (IST)
नांदेड जिल्ह्यातील नायगाव घरकुल लाच प्रकरणात कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आलं आहे. येथील भाजप आमदार राजेश पवार यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती. नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे,आमदारांनी अचानक भेट दिली आणि हा भ्रष्टाचार उघड झाला.
लाच घेतल्याचं काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी मान्य केलं होतं. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे, लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Marathi Breaking News Updates : मोंथा चक्रीवादळामुळे परिस्थिती बिघडताना दिसत आहे. या चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका बसला आहे. आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आणि १५०००० एकरवरील पिके उद्ध्वस्त झाली. या चक्रीवादळाचा परिणाम तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांमध्येही झाला.
आंध्र किनाऱ्यावर मंगळवारी रात्री उशिरा धडकल्यानंतर मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी दिसून आली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, घरे कोसळली आणि रस्ते पाण्याखाली गेले, ज्यामुळे वीजपुरवठा आणि वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, हवामान खात्याने आंध्र प्रदेश आणि उत्तर किनारपट्टीच्या काही भागात दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.






