दिवाळीनंतर शरीरात वाढलेला सुस्तपणा, आळस कमी करण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ
दिवाळी सणाला संपूर्ण देशभरात एक वेगळाच उत्साह असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात कंदील, दिवे, रांगोळी आणि गोड पदार्थांचा फराळ बनवला जातो. याशिवाय सणावाराच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सुंदर पाहुणचार केला जातो. पण सणाचे दिवस संपल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. तसेच दिवाळीमध्ये फराळातील गोड पदार्थ खाऊन शरीराची पचनक्रिया काहीशी बिघडून जाते. शरीरात अपचनाच्या समस्या वाढल्यामुळे पोटात वेदना होणे, पोटात दुखणे, मळमळ, उलट्या इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. याशिवाय रात्री जास्त वेळ जागरण केल्यामुळे झोप व्यवस्थित झोप पूर्ण होत नाही. तसेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
पचनक्रिया बिघडल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवतो. बिघडलेल्या पचनक्रियेमुळे त्वचेवरील ग्लो कमी होऊन जातो आणि चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळीनंतर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील आणि शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल.
दीर्घकाळ निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारते. सणावाराच्या दिवसांमध्ये खूप जास्त तिखट, तेलकट आणि खारट पदार्थांचे सेवन केले जाते. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या कमी करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल.
सणावाराच्या दिवसांमध्ये खूप जास्त तिखट, तेलकट आणि बाहेरील जंक फूडचे सेवन केले जाते. पण सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया काहीशी बिघडून जाते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे दिवाळीनंतर कायमच संतुलित आणि पोषण आहार घ्यावा. आहारात ताजी फळे, पालेभाज्या, थंड पदार्थ, सुका मेवा आणि पौष्टीक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर निरोगी राहते. नियमित ताक प्यायल्यास आतड्यांमधील हालचाल सुलभ राहतात आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया वाढतात.
आठवडाभर नियमित गोड तिखट पदार्थांचे सेवन करून शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. डिटॉक्स पेयांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित ३० मिनिट चालणे आवश्यक आहे. हळद, आवळा, ग्रीन टी आणि लिंबू इत्यादी गुणकारी घटकांचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
आतड्यांचे आरोग्य म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, आतड्यांचे आरोग्य म्हणजे कोणतीही जठरांत्रांची तक्रार नसताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?
प्रथिने, निरोगी चरबी, फळे, भाज्या आणि धान्यांचा आहारात समावेश करा.यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि दाह कमी होण्यास मदत होते.
आतड्यांसंबंधी संसर्ग झाल्यास काय करावे?
बहुतेक संसर्ग काही दिवसांत बरे होतात.शरीराला पुरेसे पाणी आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी ओरल रिहायड्रेशन ड्रिंक्स प्या.हे ड्रिंक्स फार्मसी आणि सुपरमार्केटमध्ये उपलब्ध आहेत.






