मेंदूतही पोहोचले सुक्ष्म, नॅनो प्लास्टिक; हृदयरोग, कर्करोगाचा धोका वाढला
अलिकडच्या एका अभ्यासात मानवी मेंदूमध्ये सूक्ष्म प्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक (एमएनपी) च्या पातळीत मोठी वाढ दिसून आली आहे. यापूर्वी देखील, मानवी फुफ्फुसे, आतडे, अस्थिमज्जा आणि प्लेसेंटामध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. या नवीन अभ्यासात, संशोधकांनी २०१६ आणि २०२४ मध्ये पोस्टमॉर्टेम केलेल्या ८० लोकांच्या मेंदू, मूत्रपिंड आणि यकृतातून प्रत्येकी एक पेशींचे नमुने घेतले. याशिवाय, त्यांनी या काळात अल्झायमर किंवा डिमेंशियामुळे मृत्युमुखी पडलेल्या १२ लोकांच्या मेंदूचे नमुने देखील घेतले. संशोधकांना असे आढळून आले की २०२४ च्या मेंदू आणि यकृताच्यानमुन्यांमध्ये २०१६ च्या तुलनेत एमएनपीचे प्रमाण खूप जास्त होते.
कँसरला नष्ट करण्यासाठी दररोज प्या हे 3 शक्तिशाली ड्रिंक्स; स्वतः हार्वर्ड डॉक्टरने दिला सल्ला
आठ वर्षांत मेंदूच्या नमुन्यांमध्ये ५०% वाढ दिसून आली. मानवी आरोग्यासाठी एमएनपी किती हानिकारक आहेत हे स्पष्ट नसले तरी, अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मानेच्या धमनीमध्ये आढळणारे एमएनपी जळजळ आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकतात. तुम्ही कधी बटर लावलेली प्लास्टिकची टपरवेअरचे भांडे स्वच्छ केले असेल, तर तुम्हाला माहिती असेल की ते स्वच्छ करण्यासाठी खूप गरम पाणी लागते. प्लास्टिकला चरबी आवडते.
या अभ्यासाशी संबंधित अमेरिकेतील बोस्टन कॉलेजमधील बालरोगतज्ञ आणि महामारीशास्त्रज्ञ डॉ. फिलिप लड्रिगन म्हणतात की, प्लास्टिकचे उत्पादन वाढत आहे, प्लास्टिक प्रदूषण देखील वाढत आहे. म्हणूनच. मानवी शरीरात प्लास्टिकची पातळी देखील त्यासोबत वाढेल हे पूर्णपणे तार्किक आहे. न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक मॅथ्यू कॅम्पेन म्हणाले की, ७०, ८० आणि ९० च्या दशकात आपण फेकलेले प्लास्टिक आता नॅनोप्लास्टिकमध्ये बदलत आहे. आपल्या पाण्यात, कृषी प्रणालीमध्ये आणि शेवटी आपल्या अन्नात प्रवेश करत आहे.
अन्न पॅकेजिंग हे मायक्रोप्लास्टिक्सचे ज्ञात स्रोत आहे, म्हणून संशोधकांना अशी अपेक्षा होती की पचनसंस्थेशी संबंधित अवयवांमध्ये, विशेषतः यकृतामध्ये एमएनपीची सर्वाधिक मात्रा आढळेल. परंतु यकृत किवा मूत्रपिंडापेक्षा मेंदूच्या नमुन्यांमध्ये ७ ते ३० पट जास्त एमएनपी आढळले. मॅव्यू कॅम्पेन म्हणाले की त्यांना मेंदू रक्त-मेंदू अडथळा (रक्तातील हानिकारक पदार्थांना मेंदूत प्रवेश करण्यापासून रोखणारा पडदा) द्वारे संरक्षित केला जाईल अशी अपेक्षा होती. परंतु ते खरे वाटत नाही. त्यांनी असाही अंदाज लावला की प्लास्टिक लिपिड (चरबी रेणू) सोबत मेंदूत प्रवेश करत असेल.