(फोटो सौजन्य: istock)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे आपण कमी वयातच अनेक आजारांना खुले आमंत्रण देत असतो आणि यातीलच एक आजार म्हणजे कँसर! आजकाल कर्करोगाचा धोका फार वाढला आहे. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी कर्करोग हा एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी लाखो लोकांना याचे निदान होते आणि या आजारामुळे मोठ्या संख्येने मृत्यू होतात. अशात कर्करोग दूर करण्यासाठी काही पथ्ये पाळणे, योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. यासोबतच आम्ही तुम्हाला आज विशेष अशा 3 ड्रिंक्सविषयी माहिती देत आहोत, ज्यांचे नियमित सेवन केल्यास तुम्ही कँसरला लवकर दूर पळवू शकता. हे पेय कर्करोगाचा धोका अनेक पटींनी कमी करतात आणि हे आम्ही नाही तर स्वतः हार्वर्ड प्रशिक्षित डॉक्टर सांगत आहेत. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व डॉ. सौरभ सेठी यांनी अशा तीन शक्तिशाली ड्रिंक्सविषयी माहिती दिली आहे, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हार्वर्ड प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी विज्ञान समर्थित काही ड्रिंक्सविषयी माहिती दिली आहे जे नैसर्गिकरित्या तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि यामुळे जळजळ देखील कमी होईल. कर्करोग रोखण्यासाठी हे एक प्रमुख घटक आहे. चला यात कोणकोणत्या ड्रिंक्सचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
ग्रीन टी
डॉ. सौरभ सेठी यांनी कर्करोग रोखण्यासाठी ग्रीन टीचे सेवन प्रभावी असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, ग्रीन टीमध्ये कॅटेचिन सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. माचा हा ग्रीन टीचा एक केंद्रित प्रकार आहे आणि म्हणूनच तो आणखी शक्तिशाली आहे. सकाळी उठताच तुम्ही याचे सेवन करू शकता.
ग्रीन स्मूदी
याशिवाय, तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या स्मूदीजचा समावेश करू शकता . ते पोषक तत्वांनी समृद्ध आणि दाहक-विरोधी असते. ते बनवण्यासाठी, पालक किंवा केल सारख्या हिरव्या पालेभाज्या घेऊन त्यात काकडी, सेलेरी, थोडे आले आणि पाणी घालून मिसळा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. रोज सकाळी आपल्या डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता.
तुर्मरिक लाटे
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे जळजळांशी लढते आणि कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहे. डॉक्टरांनी सांगितले की हे पेय त्यांचे आवडते आहे आणि ते ते बदामाचे दूध आणि चिमूटभर काळी मिरी घालून बनवतात. हळद अनेक आजारांवर एक रामबाण उपाय मानला जातो अशात तुम्ही अनेक प्रकारे याचा आपल्या आहारात समावेश करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.