परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी लाईव्ह न्यूज (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानकडून नापाक हल्ले करण्यात आले आहेत. काल (दि.08) रात्री पाकिस्तानकडून भारताच्या सीमा भागातील राज्यांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. हे सर्व ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले आहेत. मात्र पाकिस्तानने नागरी वस्तीमध्ये हा हल्ला केल्यामुळे भारताकडून देखील सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. यानंतर भारताने देखील पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेत सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देण्यात आली आहे. लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी पाकिस्तानकडून 36 ठिकाणी 400 हून अधिक ड्रोन हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानवर उत्तरादाखल केलेल्या हल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले की, “9 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या चौक्यांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी सेनेने भारतीय हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार देखील केला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषा असलेल्या लेहपासून सक्रीटपर्यंत 36 जागांवर 300 ते 400 ड्रोन हल्ले केले. तसेच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी दिलेल्या हल्ल्याच्या माहितीनुसार, “भारतीय सशस्त्र दलाने कायनेटीक किंवा नॉन-कायनेटिक साधनांचा वापर करुन यामधील अनेक ड्रोनला हाणून पाडले. पाकिस्ताने भारताची वायू हद्द ओलांडली. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हवाई घुसखोरी करण्याचा यांचा उद्देश वायू रक्षक प्रणालीची परिक्षा बघणे आणि गुप्त माहिती गोळा करणे असे होते. ड्रोनच्या तुकड्यांची फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे. याच्या प्राथमिक रिपोर्टवरुन हे तुर्कीचे ड्रोन असल्याचे समोर येत आहे. याचबरोबर रात्रीच्या वेळी पाकिस्ताच्या सशस्त्र UAV भडिंटा सैन्य स्टेशनला निशाणा करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याला पकडण्यात आले असून निष्क्रीय करण्यात आले आहे,” अशी माहिती लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे.
भारताने पाकिस्तान प्रत्युत्तर देताना पाकिस्तानवर हल्ला केला. याबाबत माहिती देताना लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी म्हणाल्या की, “पाकिस्तानी हल्ल्याच्या उत्तरामध्ये भारताकडून पाकिस्तानच्या चार वायू रक्षा तळावर सशस्त्र ड्रोन लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानने जम्मू काश्मीरचे तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उदमपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र ड्रोन आणि गोळीबार केला. नियंत्रण रेषाच्या पार गोळीबार केली. ज्यामुळे भारतीय जवान शहीद आणि जखमी झाले. भारतीय सेनेने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.”
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
“त्याचबरोबर पाकिस्तानचे बेजबाबदार वागणे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. याचबरोबर रात्रीच्या सुमारास एक विनाकारण अयशस्वी ड्रोन आणि मिलाईल हल्ले करुन पाकिस्तानने नागरिक हवाई क्षेत्र बंद केले नाही. तर पाकिस्तान त्यांचे नागरिकांचे विमान ढालीप्रमाणे वापरत आहे. भारतावर नागरी विमानावर हल्ला केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येतील हे माहिती असून पाकिस्तान विमानांचा वापर करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधून उडणारी भारत किंवा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय उड्डान करणाऱ्या नागरी विमानांसाठी हे सुरक्षित नाही,” असे म्हणत लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी फोटोसह पुरावे दाखवत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे.