नवी दिल्ली : कोणत्या तरी बॅनरवर तुम्ही “होऊ दे खर्च! सरकार आहे आपलं” अश्या प्रकारची जाहिरात पाहिली असेल. पण आता असं म्हणण्याची खरोखरच वेळ आली आहे. याला कारण सुद्धा असेच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) हे प्रसिद्धी प्रिय आहेत, हे सर्वांना माहिती आहे, पण मोदी सरकारने (Modi government) मागील पाच वर्षात म्हणजे २०१७ पासून जाहिरातीवर (Advertising) तसेच प्रसिद्धीसाठी (Publish) तब्बल तीन हजार कोटी (Three thousand crore) रुपये उधळल्याचे समोर आले आहे. ही माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राज्यसभेत दिली.
[read_also content=”लाचखोर तलाठ्यास ठोकल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या, तक्रारीवरून कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/anti-corruption-department-shackled-the-bribe-giver-action-was-taken-on-complaint-nraa-309382.html”]
दरम्यान, परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय किंवा अन्य कोणत्याही सरकारी विभागाने खर्च केलेला नाही असे ठाकूर यांनी सांगितले. राज्यसभेत प्रश्नोउत्तराच्या वेळी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल अनुराग ठाकूर यांनी ही धक्कादायक माहिती दिली. २०१७ ते यावर्षी जुलैपर्यंत प्रिन्ट मिडियामध्ये जाहिराती देण्यासाठी मोदी सरकारने जवळपास अठरा कोटी रुपये तर इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये जाहिराती देण्यासाठी सोळा कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळं विरोधक हा मुद्दा उचलून धरणार असून, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.