Rain (Photo Credit- X)
IMD Heavy Rain Alert: भारतीय हवामान विज्ञान विभागाने (IMD) उत्तर-पश्चिम भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये पुढील सात दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मान्सूनच्या वाढलेल्या सक्रियतेमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढला आहे.
🚨 Nationwide Rain Alert
India Meteorological Department (IMD) has issued red alerts for states like Himachal Pradesh, Uttarakhand, Chhattisgarh, Odisha, Gujarat & Madhya Pradesh, and orange alerts for Punjab, J&K, Haryana, Telangana, Goa & parts of Maharashtra and Coastal…
— Praffulgarg (@praffulgarg97) September 3, 2025
प्रशासनाने पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य वेगात सुरू केले आहे. हिमाचलमध्ये 1,311 रस्ते बंद असून शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला हाय अलर्टवर ठेवले आहे. नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.