एक जूनला केरळमध्ये पोहोचणार मान्सून; तर महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत सक्रिय होण्याची शक्यता

सध्या वातावरणाचा अंदाज पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी हवामानशास्त्र विभागाकडून अजून मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

    नवी दिल्ली : सध्या वातावरणाचा अंदाज पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी हवामानशास्त्र विभागाकडून अजून मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

    नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 19 मे च्या जवळपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. पुढील तीन दिवसही महाराष्ट्रातील बहुतांशी भागात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    याशिवाय 25 जूनपर्यंत तो हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्येही पोहोचेल आणि 30 जूनला तो राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये पोहोचेल आणि पुढे सरकत 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल.