Medha Patkar News: मेधा पाटकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; काय आहे 25 वर्षांपूर्वीचे प्रकरण?
मुंद्रा बंदरातील २१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीतील व्यावसायिक हरप्रीत सिंग तलवार उर्फ कबीर तलवार यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आज (१३ मे) न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने हरप्रीत तलवार यांना सध्या जामीन नाकारत, सहा महिन्यांनंतर पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे. तसेच, खटल्याचा निर्णय लवकर घेता यावा यासाठी विशेष न्यायालयाला महिन्यातून दोन वेळा सुनावणी घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
तलवार यांच्यावर लावण्यात आलेला ‘दहशतवादासाठी वित्तपुरवठा’ हा आरोप सध्या तरी अकाली वाटतो. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २३ एप्रिल २०२५ रोजी या प्रकरणातील जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता.यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) दिलेल्य माहितीनुसार की, ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेले पैसे लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्यात वापरले जात होते. दिल्लीमध्ये काही क्लब्स चालवणाऱ्या हरप्रीत सिंग तलवारला ऑगस्ट २०२२ मध्ये एनआयएने अटक केली होती.
PM Narendra Modi: “… तर आम्ही घरात घुसून मारणार; आदमपूर एअरबेसवरून मोदींनी पाकिस्तानला सुनावले
मुंद्रा बंदरातील २१,००० कोटी रुपयांची ड्रग्ज तस्करी ही देशातील आजवरची सर्वात मोठी ड्रग्ज तस्करी मानली जाते. १२ सप्टेंबर २०२१ रोजी, अफगाणिस्तानहून इराणमार्गे आलेले काही कंटेनर गुजरातमधील मुंद्रा बंदरावर पोहोचले. या कंटेनर्समध्ये अर्ध-प्रक्रियित टॅल्क दगडांनी भरलेल्या पिशव्या होत्या. गुप्तचर माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने १३ सप्टेंबर २०२१ रोजी या कंटेनर्सची तपासणी केली.
तपासादरम्यान काही पिशव्यांमध्ये हेरॉइन आढळून आले, ज्यामुळे तब्बल २९८८.२१ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या ड्रग्जची अंदाजित बाजारभावाने किंमत सुमारे २१,००० कोटी रुपये होती. तपास यंत्रणांनी रोखलेली ही खेप सहावी आणि शेवटची होती, अशीही माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. प्रकरणात अफगाण नागरिकांसह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई मिळणार का? राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्टच सांगितलं
मागील सुनावणीवेळी एनआयएने गुजरातमधील मुंद्रा बंदरगृहावर २१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्लीच्या व्यावसायिक हरप्रीत सिंग तलवार ऊर्फ कबीर तलवार याच्या जामिनाच्या अर्जाचा बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध केला.
एनआयएने म्हटले की, या ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेली रक्कम लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या कारवायांसाठी वापरण्यात येणार होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने तलवारच्या जामिनाच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. तलवार दिल्लीतील अनेक प्रसिद्ध क्लब्सचा संचालनकर्ता होता. या प्रकरणात त्याला ऑगस्ट २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. भारतात ही आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज जप्ती मानली जाते.
एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले, “हे लोक जरी एखाद्या संघटनेचे मुखवटे असले, तरी त्यांचे हातही दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमावलेल्या निरपराध लोकांच्या रक्ताने रंगलेले असतात. हे प्रकरण भारतात अर्धप्रक्रियित टॅल्क स्टोनच्या कायदेशीर आयातीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी करण्याचे आहे. एजन्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, “सदर अर्धप्रक्रियित टॅल्क स्टोन हे प्रत्यक्षात हेरॉईनने भरलेले दगड होते, जे नुकत्याच सुरू झालेल्या प्रोप्रायटरशिप फर्म्स आणि मुखवटा कंपन्यांच्या नावावर भारतात आयात करण्यात आले होते. या कंपन्यांनी या हेरॉईनने भरलेल्या टॅल्क स्टोनना व्यापारिक वस्तू म्हणून दाखवले होते.”