फोटो सौजन्य: X.com
अंतराळ हे नेहमीच वैज्ञानिकांसाठी अभ्यासाचा केंद्रबिंदू राहिले आहे. त्यामुळे देशातील वैज्ञानिकांच्या पुढाकाराने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले जातात. गेल्या काही वर्षांत Indian Space Research Organisation म्हणजेच इस्रोने, विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे, NASA ने देखील अत्याधुनिक उपग्रहांच्या सहाय्याने आणि त्यातून करण्यात आलेल्या अभ्यासाच्या माध्यमातून अंतराळातील अनेक महत्त्वाचे तथ्य जगासमोर मांडले आहेत. आता, या दोन्ही बलाढ्य अंतराळ संशोधन संस्थेने एकत्रित येत ‘निसार मिशन’ ची सुरुवात केली आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) येथून GSLV-F16 वर NASA-ISRO NISAR उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. हा ISRO आणि NASA चा संयुक्त प्रकल्प आहे.
हा उपग्रह भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आधीच सूचना देईल. हे उपग्रह भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासा यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. हा जगातील पहिला उपग्रह आहे जो दोन रडार फ्रिक्वेन्सी (एल-बँड आणि एस-बँड) वापरून पृथ्वीला स्कॅन करेल. त्यामुळेच या उपग्रहाला पृथ्वीचा MRI Scanner देखील बोलले जात आहे.
NISAR हा NASA आणि ISRO ने बनवलेला लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह आहे. त्याचे पूर्ण नाव NASA-ISRO सिंथेटिक एपर्चर रडार आहे. ते पृथ्वीचा पृष्ठभाग, बर्फ आणि जंगलांचे स्कॅन करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. त्याला “पृथ्वीचा MRI स्कॅनर” देखील म्हंटले जात आहे कारण हा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे खूप बारीक फोटो काढू शकतो, जसे डॉक्टर MRI स्कॅनद्वारे शरीरातील बारीक बारीक गोष्टी पाहतो.
कुंकूच राहिलं नाही आणि ऑपरेशन मात्र ‘सिंदूर’, कोण आहेत हे लेखक; जया बच्चन राज्यसभेत भडकल्या
हा उपग्रह दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे स्कॅन करेल आणि भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा इशारा देण्यास मदत करेल. या मिशनसाठी 13000 कोटी रुपयांचा (1.5 अब्ज डॉलर्स) खर्च आला आहे, ज्यामध्ये इस्रोचे योगदान 788 कोटी रुपये आहे. त्याचा डेटा जगभरातील शास्त्रज्ञ, सरकार आणि सामान्य लोकांना मोफत उपलब्ध असेल.