गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण (फोटो- सोशल मिडिया)
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एकतर सरेंडर करा नाही तर सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार व्हा असा इशारा नक्षलवाद्यांना दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात विकासकार्य करत आहे. तसेच त्या ठिकाणी त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केला आहे. दरम्यान आता तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
नक्षलवादाच्या इतिहासात एकचवेळेस ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्षलवाद्यांचा कुख्यात नेता सोनू याच्यासह ६० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांचा नेता असणारा भूपती उर्फ सोनूवर तब्बल १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दरम्यान सोनूने आपल्या सहकाऱ्यांसाह आत्मसमर्पण केल्याने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. आता त्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
भारत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल, असे मोठे विधान केले आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे युद्धविराम करण्याचा प्रस्ताव धाडला होता. हा प्रस्ताव आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुडकावून लावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे. सरकार युद्धविराम करण्याच्या बाजूने नसल्याने अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एकतर शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे किंवा सुरक्षादलांच्या गोळ्यांचे शिकार व्हा, हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्यासमोर असल्याचे अमित शहा म्हणाले आहे.
अमित शहा म्हणाले, “नुकतेच एक पत्र लिहून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. या पत्रात युद्धविराम होयला हवा असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा युद्धविराम होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. आत्मसमर्पण करायचे असेल तर युद्धविरामाची आवश्यकता नाही. मात्र आता बोलणी नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्याचे लक्ष्य नक्षलवाद्यांना नष्ट करणे हाच आहे.