नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे, देशाला नवीन महिला राष्ट्रपती मिळाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. मतदान फेरीत पहिल्यापासूनच द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. काही वेळापूर्वी द्रौपदी मुर्मू यांना 408 मते मिळाली होती, तर विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 204 मते मिळाली होती. पण अंतिम आकडेवारी अजून समोर आली नाही. दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान (President Election Voting) झाल्यानंतर आज २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संसद भवनात (Parliament) मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विजयी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे त्यांनी विजय प्राप्त केला आहे.
[read_also content=”सरकारने काळानुरुप मानसिकता बदलावी, उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले https://www.navarashtra.com/maharashtra/the-government-should-change-its-mindset-with-the-times-the-high-court-told-the-government-306689.html”]
दरम्यान, आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या आहेत. पहिल्या आदिवासी महिला (Tribal Woman) राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. १५ वर्षांपूर्वी २१ जुलै २००७ रोजी प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. दरम्यान, देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असून, नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.