निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश यांचा मास्टरस्ट्रोक, या कर्मचाऱ्यांना आता दुप्पट वेतन मिळणार
बिहारमध्ये येत्या वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान बिहार सरकार शिक्षण क्षेत्रात दीर्घकालीन सुधारणा केल्याचा दावा करत असताना आता अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा लाखो कामगारांना थेट फायदा होणार आहे.
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाक्यांचं मानधन १६५० रुपये वरून ३३०० रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. यासोबतच, सुरक्षारक्षक आणि शारीरिक शिक्षण आणि आरोग्य प्रशिक्षकांचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
कोणात्या कामगारांची किती पगार वाढ?
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाक्यांचे मानधन ₹ १६५० वरून ₹ ३३०० प्रति महिना करण्यात आले आहे.
माध्यमिक/उच्च शाळांमध्ये काम करणाऱ्या रात्ररक्षकांचे मानधन ₹ ५००० वरून ₹ १०००० प्रति महिना करण्यात आले आहे.
शारीरिक शिक्षण आणि आरोग्य प्रशिक्षकांना आता दरमहा ₹८००० ऐवजी १६००० रुपये मानधन मिळेल आणि त्यांच्या वार्षिक पगारवाढीमध्ये २०० वरून ४०० रुपये वाढ करण्यात आली आहे.
शिक्षणाचे एकूण बजेट ४३६६ वरून ७७६९० कोटी रुपये करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘नोव्हेंबर २००५ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहोत. २००५ मध्ये शिक्षणाचे एकूण बजेट ४३६६ कोटी रुपये होते जे आता ७७६९० कोटी रुपये झाले आहे. मोठ्या संख्येने शिक्षकांची नियुक्ती, नवीन शाळा इमारतींचे बांधकाम आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा झाली आहे.’
त्यांनी पुढे लिहिले की, ‘शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यात कुक, रात्ररक्षक आणि शारीरिक शिक्षण आणि आरोग्य प्रशिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेऊन, आम्ही या कामगारांचं मानधन सन्माननीयरित्या वाढवून दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी
शिक्षण विभागांतर्गत मध्यान्ह भोजनात काम करणाऱ्या स्वयंपाक्यांचे मानधन १६५० रुपयांवरून ३३०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, माध्यमिक/उच्च शिक्षण शाळेत काम करणाऱ्या रात्रपाळीचे मानधन ५००० रुपयांवरून १०००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, शारीरिक शिक्षण आणि आरोग्य प्रशिक्षकांचे मानधन ८००० रुपयांवरून १६००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, त्यांची वार्षिक वेतनवाढ २०० रुपयांवरून ४०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कार्यरत कामगारांचे मनोबल वाढेल आणि ते अधिक उत्साहाने आणि समर्पणाने त्यांचे काम करतील, असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार यांचा हा निर्णय सरकारचा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो निवडणुकीपूर्वी तळागाळातील कामगार वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. यामुळे केवळ शिक्षण व्यवस्थाच मजबूत होणार नाही, तर मतपेढीवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांच मत आहे.