operation sindoor (फोटो सौजन्य : social media)
Operation Sindoor: भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्य्याचा बदल घेला आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केलं. भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चला जाणून घेऊयात कोणत्या- कोणत्या ठिकाणी हे स्ट्राइक करण्यात आली? आणि ते इंटरनॅशनल बॉर्डरपासून किती लांब आहेत?
Operation Sindoor: जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.
मुरीदके : हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता.
गुलपुर : हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून 35 किलोमीटर दूर आहे.
लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे.
बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.
कोटली : LOC पासून 15 किमी अंतरावर लष्करचा तळ होता. 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.
बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून 8 किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.
मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.
भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल असे इशारा पाकिस्तानला दिला होता.भारताने मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. इंडियन आर्मी आणि संरक्षण मंत्री यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.