Photo Credit- Social Media राज्यसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव सादर करणार
INDIA Block to Move Confidence Motion: विरोधक राज्यसभेत अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर विरोधक या अधिवेशनात हा प्रस्ताव आणू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया ब्लॉक राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकते. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये टीएमसी, आम आदमी पार्टी आणि सपा यांचा समावेश आहे. जे संविधानाच्या अनुच्छेद 67 (B) अंतर्गत सादर केले जाईल.
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील तापमान वाढू लागले आहे. आता विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधी आघाडी एकत्र आली असून समाजवादी पक्ष (एसपी) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.
Bangladesh Violence: बांगलादेशात का होतायेत हिंदुंवर अत्याचार; काय आहे जमात-ए-इस्लामीचा प्लॅन?
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीपासू दूर राहिलेल्या टीएमसी आणि सपा खासदारांनीही अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मंगळवारी राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. अविश्वास प्रस्ताव तयार असून त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून राज्यसभेत सोमवारी ज्याप्रकारे गदारोळ झाला, त्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्ष जगदीप धनखर यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते.
Bangladesh Hindu Violence: पुन्हा एकदा चिन्मय दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा
विशेष म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी या प्रस्तावावर 50 सदस्यांच्या सह्या आवश्यक आहेत. सभापती धनखर यांच्या विरोधातील ठरावावर 70 सदस्यांनी सह्या केल्या आहेत. संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सभापतींना हटवण्याचा प्रस्ताव आणल्याची चर्चा होती, मात्र त्यानंतर विरोधकांनी तो स्थगित ठेवला होता.
राज्यसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रस्ताव सचिवालयाकडे पाठवावा लागतो. किमान 14 दिवस अगोदर दिलेली ही नोटीस, राज्यसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो लोकसभेत पाठवावा लागतो. अध्यक्ष हे देशाचे उपराष्ट्रपती देखील आहेत, जे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. अशा स्थितीत त्यांना पदावरून हटवण्यासाठी हा प्रस्ताव लोकसभेतही मंजूर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशन फक्त 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
Bangladesh Hindu Violence: पुन्हा एकदा चिन्मय दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा