नवी दिल्ली : आमच्या देशामध्ये गुवणत्तेची कमतरता नाही; पण दुर्दैवाने आमच्याकडे अशी व्यवस्था तयार झाली जिथे शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरीपुरताच (Education Limited For Job) मर्यादित राहिला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या शिक्षणविषयक धोरणामध्ये थोडा बदल झाला, पण सर्वांत मोठा बदल मागेच राहिला होता. इंग्रजीमुळे (English) तयार झालेली व्यवस्था कधीच भारताच्या मूळ स्वभावाचा भाग नव्हती आणि ती होऊदेखील शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.
तीन दिवसांच्या अखिल भारतीय शिक्षण समागमाच्या (Akhil Bhartiya Shikshan Samagam) उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मोदी म्हणाले की, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य आधार हा शिक्षणाला संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून त्याला २१ व्या शतकातील विचारांशी जोडणे हा आहे. या अमृत काळामध्ये देशाने केलेल्या संकल्पांची पुर्तता करण्याची मोठी जबाबदारी शिक्षण व्यवस्था आणि युवा पिढीवर आहे.
मोदींच्या हस्ते १,७७४ कोटींच्या विकासप्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. येथील संपूर्णानंद स्टेडियमवर (Sampurnanand Stadium) मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकल्पामध्ये शिक्षण, रस्ते, रेल्वे, महामार्ग आणि पर्यटनक्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल (AnandiBen Patel), मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यावेळी उपस्थित होते.