"मुस्लीमांचा हिंदुस्थानी असल्याचे आवाहन," पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात कोंबिंग ऑपरेशन (फोटो सौजन्य-X)
वसई । रविंद्र माने : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.याचपार्श्वभूमीवर पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नालासोपारा पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन करण्यास सुरवात केली आहे. याच भितीने परप्रांतियांची पळापळ सुरु झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव,चक्रेश्वर तलाव आणि हेडगेवार चौकात पाकिस्तानी झेंडे पायदळी तुडवण्यात आले.आणि या झेंड्यांचे समर्थन करण्यासाठी काही मुस्लीम महिला आणि पुरुष सरसावल्यामुळे नालासोपारातील वातावरण गढूळ झाले होते.त्यामुळे कोंबीग करुन वातावरणावर पकड मिळवण्यासाठी पोलीसांनी सोमवारी निळे-मोरे परिसरात धाड टाकली.या परिसरातील कामगार आणि संशयितांना ताब्यात घेवून,त्यांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.तसेच त्यांच्या आधारकार्डची ही तपासणी करण्यात आली.सुमारे ७० जणांना ताब्यात घेवून त्यांची झाडाझडती घेण्यात आल्यामुळे संशयित बांग्लादेशी,नायजेरियन आणि पाकिस्तान्यांची पळापळ झाली आहे.
दरम्यान,चार दिवसांपुर्वी पाकिस्तानी झेंड्याबाबत झालेल्या वादावर माजी उपमहापौर सगीर डांगे यांनी आम्ही मुसलमान अमन आणि शांती मानणारे हिंदुस्थानी आहोत.असे आवाहन एका व्हिडीओद्वारे करुन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.हिंदुस्थान आमचा देश आहे,आम्ही या देशात जन्मालो आलो आहे,आमचे या देशावर नितांत प्रेम आहे.आमचे पुर्वज या जमीनीत दफन झाले आहेत.आम्हीही इथेच दफन होणार आहोत.आम्हाला पाकिस्तानशी काहीही देणे-घेणे नाही,पहेलगाम हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.आमच्यात कोणताही दुरावा,गैरसमज,असता कामा नही,कारण मजहब नही शिकाता आपस में बैर रखना,हिंदी है हम वतन है हिंदुस्तां हमारा,सारे जहांसे अच्छा हिंदुस्तां हमारा असे स्प्ष्ट करुन शांत राहण्याचे आवाहन डांगे यांनी केले आहे.
पाकिस्तानात नेमकं चाललंय काय? कराचीत मोठा स्फोट अन् उरलेले पाणीही गेले नाल्यांमध्ये वाहून






