भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला (फोटो- सोशल मिडिया)
श्रीनगर: गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगामच्या बैसरन् खोऱ्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतरभारत सरकार आणि भारतीय सुरक्षा दले चांगलेच आक्रमक झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील आणि संपूर्ण दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यामध्ये सैन्य दलांना फ्री हँड देखील देण्यात आला आहे. त्यातच आता पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
भारताने ज्या पद्धतीने आक्रमक पावले उचलली आहेत, त्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी अशी स्थिती झाली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती पाक सरकारला वाटत आहे. त्यामुळे त्यांचे सैन्य दले सतर्क झाली आहेत. भीतीपोटी पाकिस्तान एलओसीवर सीजफायरचे उल्लंघन करत आहे. भारत देखील याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
पाकिस्तानी रेंजर्स सीमेवर गोळीबार करतआहेत. त्याला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सैन्य घाबरले असल्याचे म्हटले जातआहे. सीमेवरील काही चौक्या पाकिस्तानी रेंजर्सने सोडले असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानने आपल्या चौक्यांवरील पाकिस्तानचे झेंडे देखील उतरवले असल्याचे म्हटले जात आहे.
सीमेवर 20 चेकपोस्टवर भारतीय लष्कर व पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात धुमश्चक्री झाल्याचे म्हटले जात आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होईल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये नो फ्लाय एअर झोन घोषित केला आहे.
LOCवर गोळीबार, भारतीय सैन्यानेही दाखवली ताकद
पहलगाम हल्ल्याची आग विझलेली नसताना पाकिस्तानकडून अजूनही कुरापती सुरूच आहेत. पहमगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेतून गोळीबार झाला होता. त्यानंतर काल पुन्हा पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेवर (LoC) कोणत्याही प्रकारची चिथावणी न देता गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत त्यांना परतून लावले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांकडून सातत्याने ऑपरेशन्स सुरूच आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हल्ल्यात सामील असलेल्या या दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली. नुकतीच सुरक्षा दलांनी खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची आणखी दोन घरे उद्ध्वस्त करण्यात आली. भारतीय सैन्याकडून लष्कर ए तैयबाचा दहशतवादी एहसान अहमद शेखचे दुमजली घर स्फोटके लावून उडवून दिले. एहसान अहमद शेख जून २०२३ पासून लष्करचा सदस्य होता आणि तो पुलवामामधील मुरानचा रहिवासी आहे.