पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; 11 वर्षांत पहिल्यांदाच देणार स्मृती भवनाला भेट (File Photo : Narendra Modi)
पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. या तांत्रिक बिघाडामुळे त्यांचं विमान तातडीने देवघर विमानतळावर उतरवण्यात आले आहे. पंतप्रधान एका विशेष विमानाने देवघर आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने जमुईला गेले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी झारखंडमध्ये गेले होते. सभा आटोपून परतत असताना, त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. पायलटने तातडीने देवघर विमानतळावर उतरवलं आहे. त्यामुळे मोदींना दिल्लीला परतण्यास विलंब झाला आहे. विमानात नेमकी काय बिघाड झाली होती, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचं लँडींग करण्यात आलं आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन प्रचार सभांना संबोधित केलं. त्याआधी बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यांच्या सभांमध्ये मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. राहुल गांधींना “शहजादा” म्हणतस त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेससोबत आघाडीमध्ये असलेला झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) पक्ष बांगलादेशी घुसखोरांना झारखंडमध्ये कायमचं रहिवासी बनविण्यास मदत करत आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार चालू असताना, १५ नोव्हेंबर रोजी पीएम मोदी बिहारच्या जमुईमध्ये पोहोचले, जिथे त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीसाठी कार्यक्रमात भाग घेतला.
पीएम मोदी यांनी जमुईत ६,६४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले की, आदिवासी समाज मागील सरकारांच्या काळात दुर्लक्षित राहिला आहे. स्वतंत्र्य संग्रामातील योगदानाची उपेक्षा केली गेली होती. केवळ भाजप-नेतृत्व असलेल्या केंद्र सरकारनेच आदिवासींसाठी कल्याण विभाग स्थापन केला आणि त्याच्या बजेटमध्ये वाढ केली आहे. तसेच एनडीए सरकारनेच भारताला पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संधी दिली आहे.
नरेंद्र मोदींची काल दादरमधील शिवाजी पार्कवर शेवटची सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसने अनेक प्रकल्प बंद करण्याची भाषा करून महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान केला आहे. जातीजातीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे. मुंबईतील अटल सेतू, मेट्रो लाईन बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला होता. या सभेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
कॉंग्रेसने कधीही आदिवासी आणि दलित मागास समाजाचा विकास करण्याचा विचार केला नाही. जातीजातीत फूट पाडून वेगळं ठेवण्याचं काम केलं. महायुतीकडून मात्र त्या समाजाला एकत्र आणण्याचं आणि मूळ प्रवाहात आणण्याचं काम सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कॉंग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये लागू केलं नाही. हा बाबासाहेबांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी या सभेत केला.