चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चं चंद्रावर यशस्वी लँंडिग झालंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दक्षिण आफ्रिकेतून खास भाषणं केलं. ते म्हणाले की,आपल्या डोळ्यासमोर असा इतिहास घडताना बघतो तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना आपल्या राष्ट्रजीवनाची चिरंजीव भावना आहे. हे क्षण अभूतपूर्व आहेत. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण अवघड महासागारांना पार करण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे. हा क्षण 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण भारतात नवी ऊर्जा, नवी विश्वास आणि नवी चेतना देणारा आहे. भारताच्या उदयास येणाऱ्या भाग्याचा आहे.
ते पुढे म्हणाले, अमृत काळात यशस्वीतेचा हा पाऊस आहे. भारत आता चंद्रावर आहे. भारत अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साथीदार झालेले आहोत. मी यावेळी ब्रिक्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी द. अफ्रिकेत आहे. पण सगळ्या देशवासियांप्रमाणेच चांद्रयानाकडे माझं लक्ष आहे. नवीन इतिहास घडल्यानंतर भारतीयांना आनंद झालेला आहे. प्रत्येक घरात उत्सव सुरु झालाय. मीही या उत्साहात सहभागी आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की,चांद्रयान, इस्रो आणि वैज्ञानिकांचं अभिनंदन करतो. ज्यांनी यासाठी प्रचंड परिश्रम केले आहेत. भावूक असलेल्या या क्षणांसाठी 140 कोटी भारतीयांचं कोटी कोटी अभिनंदन करतो. वैज्ञानिकांच्या परिश्रमानं आणि प्रतिभेनं चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पोहचला आहे, ज्या ठिकाणी कोणताही देश पोहचू शकलेला नाही. आजपासून चंद्राशी जोडलेली मिथकं, कथा बदलल्या जातील. नव्या पिढीसाठी म्हणीही बदलल्या जातील. भारतात सर्व भारतीय धरतीला आई म्हणतात आणि चंद्राला मामा म्हणतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की ‘चंदा मामा बहोत दूर के…’ आता असं म्हणतील की ‘चंदामामा एक टूर के.’