मिझोराम येथे झाले सत्तांतर; झेडपीएमच्या हाती सत्ता, विधानसभेत प्रथमच तीन महिलांची एन्ट्री

मिझोराममध्ये (Mizoram Politics) सत्तांतर झाले असून, येथील जनतेने एमनएनएफला बायबाय करत झेडपीएमच्या हाती सत्ता सोपविली आहे. या निवडणुकीत लालदुहोमा यांच्या पक्षानेही मोठा विजय मिळवून इतिहास रचला आहे.

    एझवाल : मिझोराममध्ये (Mizoram Politics) सत्तांतर झाले असून, येथील जनतेने एमनएनएफला बायबाय करत झेडपीएमच्या हाती सत्ता सोपविली आहे. या निवडणुकीत लालदुहोमा यांच्या पक्षानेही मोठा विजय मिळवून इतिहास रचला आहे. मिझोराममध्ये पहिल्यांदाच 40 सदस्यांच्या विधानसभेसाठी तीन महिला उमेदवार निवडून आल्या. यावेळी मिझोराम विधानसभा निवडणुकीत 16 महिला उभ्या होत्या. या 16 महिलांपैकी केवळ तीन महिलांनीच बाजी मारली आहे.

    झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेपीएम) च्या उमेदवार लालरिनपुई लुंगलेई पूर्व मतदारसंघातून विजयी झाल्या आणि त्यांच्या पक्षाचे सहकारी आणि टेलिव्हिजन अँकर बेरिल वान्नेहसांगी आयझावी दक्षिण-3 जागेवरून निवडून आल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंट (एमनएफ) च्या प्रवो चकमा यांनी पश्चिम तुइपुई, लालरिनपुई आणि प्रावो यांनी त्यांच्या पुरुष काँग्रेस उमेदवारांचा पराभव केला, तर बरील वानेहसांगी यांनी त्यांच्या एमनएनफ प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.

    ख्रिश्चनबहुल (87 टक्के) मिझो समाज पारंपरिकपणे पितृसत्ताक संस्कृतीचे अनुसरण करतो. मिझोरामच्या मुख्य राजकीय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांना क्वचितच उमेदवारी दिली आहे.

    महिलांना कधीही विजय मिळाला नाही

    7 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत 16 महिलांसह 174 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, तर 2018 मध्ये 18 महिलांसह एकूण 209 उमेदवारांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत सहा महिला उमेदवारांसह 136 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. 2013 किंवा 2018 च्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार विजयी झाला नाही.