लग्नात मंत्र लवकर म्हणत नसल्याने पंडितलाच केली मारहाण, नवरदेवावर गुन्हा दाखल

लग्न मंडपामध्ये लग्न लाऊन देणाऱ्या पुजाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे. चक्क नवरदेवानेच पुजाऱ्याला मारहाण केली.

    लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊ मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न मंडपामध्ये लग्न लाऊन देणाऱ्या पुजाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे. चक्क नवरदेवानेच पुजाऱ्याला मारहाण केली. लग्न लवकर उरकत नसल्यामुळे नवरदेवाने पुजाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.

    मेरठच्या रहिवाशी असलेल्या सोनू जाटवचे लग्न निगोहां रामपूरमध्ये राहणाऱ्या ओमप्रकाश यांच्या मुलीसोबत ठरला होता. रामपूर गढीतील क्लासिक रेस्टॉरेंट येथे लग्न समारंभ होता. मात्र लग्न मंडपामध्ये सात फेरे घेताना लवकर लवकर मंत्र वाचण्यासाठी सोनू पुरोहितावर दबाव आणत होता. लवकर लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती. त्याने पुरोहिताला तसे सांगितले. पण, पुरोहित काही ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे नाराज झालेल्या आणि संतापलेल्या शिपायाने पुरोहिताला बेदम मारहाण सुरु केली. विवेक शुक्ल असे मारहाण झालेल्या पुरोहिताचे नाव आहे. या घटनेनंतर लग्नामध्ये व्यत्यय आला.

    लग्न लावणारे पंडित विवेक शुक्ल हे लग्नच्या विधींचा अर्थ नवविवाहित जोडप्याला सांगत होते आणि संपूर्ण विधींनुसार लग्न लावून देत होते. मात्र याचा राग नवरदेव असलेल्या सोनूला आला. त्याने पंडितला मारहाण केली. यामुळे पंडितचा भाऊ मध्ये पडला. मात्र सोनूने त्याचा भावाला देखील मारहाण केली. यानंतर पंडित शुक्ल आणि त्याच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.