Maharashtra Breaking News Updates Today:
दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेले हे सहा खासदार बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन आपला पाठिंबा शिंदे गटाला असल्याचे स्पष्ट करणार असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. लोकसभेतील या संभाव्य बंडखोरीच्या बदल्यात फुटीर खासदारांच्या या गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय जाधव आणि संजय दिना पाटील दिल्लीत दाखल झाले असून, या बंडखोरीला रोखण्यासाठी ठाकरे गटाकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील हे संकट दूर करण्यासाठी अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत संकटमोचकाच्या भूमिकेत सक्रिय झाले असून, राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
17 Jun 2026 06:00 PM (IST)
आरोग्यविषयक आजारांचे वाढते प्रमाण पाहता, आरोग्य विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कोविड-१९ महामारीपासून आरोग्य विमाधारकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. महागडे उपचार टाळण्यासाठी, लोक आरोग्य विम्यासाठी जास्त प्रीमियम भरत आहेत. त्याच वेळी, कंपन्या दरवर्षी प्रीमियम वाढवत आहेत. असे असूनही, अनेक लोकांना त्यांचे दावे मिळत नाहीत. एका अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अंदाजे १२ पैकी एक आरोग्य विमा दावा नाकारण्यात आला.
17 Jun 2026 05:45 PM (IST)
खेड : यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान झाली. १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदा उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांच प्रमाण ९४.१० टक्के आहे. मात्र इयत्ता दहावीच्या २०२४-२५ च्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रेयस निलेश तांबे याला अद्यापही राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय गुणवत्ता पुरस्काराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने समाजकल्याण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
17 Jun 2026 05:30 PM (IST)
स्टार प्रवाह वाहिनीवर 29 जूनपासून सुरू होणाऱ्या ‘विसरू नको तू मला’ या नव्या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची नवी जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. कोकणातील निसर्गरम्य गुहागर येथे मालिकेचे चित्रीकरण सुरू असून, सुंदर लोकेशन्स आणि भावनिक प्रेमकथा यामुळे ही मालिका चर्चेत आहे.
या मालिकेत शाल्व ‘सूर्या तांडेल’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सूर्या हा नाखवा कुटुंबातील जबाबदार, कष्टाळू आणि सर्वांचा लाडका मुलगा आहे. बाहेरून कठोर आणि रांगडा वाटणारा हा तरुण मनाने मात्र अत्यंत प्रेमळ असून गरज पडल्यास इतरांच्या मदतीला धावून जाणारा आहे. त्याच्या जन्मानंतर कुटुंबाच्या व्यवसायाला भरभराट मिळाल्याची भावना घरातील सदस्यांमध्ये असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्याच्या हस्ते केली जाते. त्यामुळे सूर्या हा केवळ कुटुंबातील सदस्य नसून त्यांचा ‘लकी चार्म’ मानला जातो.
17 Jun 2026 05:15 PM (IST)
INDIA Vs Afghanistan 2nd ODI Match Live: लखनौच्या स्टेडियमवर भारतीय संघाने धुमाकूळ घातला आहे. अफगणिस्तानविरुद्ध भारत आज आपला दूसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. अफगणिस्तानच्या संघाने बहर्ताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान कर्णधार शुभमन गिलने खणखणीत दीड शतक ठोकले आहे. १५४ रन्सची दमदार खेळी करून आउट झाला.
भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. पहिल्या सामन्यात देखील कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी केली होती. शुभमन गिलने शतकी खेळी केली होती. आजच्या सामन्यात देखील कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी केली आहे. इशान किशन आणि शुभमन गिलने मोठी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. कर्णधार शुभमन गिलने शानदार दीड शतक ठोकले आहे. शुभमन गिल 154 रन्स केल्या.
17 Jun 2026 05:01 PM (IST)
Indo Pacific Command News in Marathi : फ्रान्समध्ये G7 सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेची अपेक्षा आहे. परंतु या भेटीपूर्वी अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या लष्करी कमांडने इंडो-पॅसिफिक नावातून इंडो शब्द हटवत पॅसिफिक कमांड असे नाव दिले आहे.
इंडो-पॅसिफिक कमांड ही संकल्पना भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वाड गटाशी संबंधित आहे. हा क्वाड गट चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर या दोन्ही क्षेत्रांच्या एकत्रित महत्त्व या नावामुळे मिळत होते. मात्र, यात बदल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
17 Jun 2026 04:58 PM (IST)
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत ( ICC Womens T20 World Cup 2026) स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. साउदम्प्टन येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा पाच विकेट्सने पराभव केला. ‘गट ब’ मधील या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ६ विकेट्स गमावून १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने दोन चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले. नीलक्षिका सिल्वाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. तिने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५४ धावा केल्या.
17 Jun 2026 04:48 PM (IST)
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट (NEET 2026) यंदा पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली आहे. लाखो विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत होते. मात्र, परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान समोर आलेल्या एका धक्कादायक रिपोर्टने सर्वांची चिंता वाढवली आहे. या रिपोर्टनुसार, वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत नीट परीक्षेशी संबंधित किमान १४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे गुन्हे समोर आले आहेत. यातील ५ घटना तर परीक्षा रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर घडल्याचे सांगितले जात आहे.
17 Jun 2026 04:35 PM (IST)
लखनौचा एकाना क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारतीय संघाने आज शानदार सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मागील सामन्यात शुभमन गिलचे शतक थोडक्यासाठी राहिले होते. अखेर या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली. त्यासोबत इशान किशनने देखील शानदार शतक ठोकले आहे.
17 Jun 2026 04:22 PM (IST)
नीरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने व उपलब्ध पाणी साठा मर्यादीत असल्याने पर्यायाने बारामती शहरात पाणी पुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार आहे. गुरूवार (१८ जून) पर्यंत बारामती शहर, जळोची, रुई, तांदुळवाडी, बारामती ग्रामिण भाग मध्ये नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यानंतर एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
17 Jun 2026 04:10 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. आता या सर्व खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना आता अंबादास दानवे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
17 Jun 2026 03:55 PM (IST)
आज, १७ जून रोजी, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. हा सामना लखनौ येथील श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसरा एकदिवसीय सामना दुपारी १:३० वाजता सुरू झाला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ७ गडी राखून पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यावरही भारताची पकड सध्या दिसून येत आहे. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:50 PM (IST)
अमेरिका-इराण शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे आणि जगाला दीर्घकाळ सतावणारे होर्मुझ सामुद्रधुनीचे संकट अखेर संपुष्टात आले आहे. जगाच्या २० टक्के तेल आणि वायूची गरज भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सागरी मार्ग प्रतिक्षेनंतर आता खुला झाला आहे. त्यातून इराणी तेलवाहू जहाजे दिसू लागली आहेत. होर्मुझ संकटाचे वर्णन जागतिक तेल बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठे संकट असे केले जाते. पण त्यात जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात चीनमध्ये राजदूत म्हणून कार्यरत असलेले भारताचे माजी परराष्ट्र मंत्री विजय गोखले यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. होर्मुझपेक्षाही मोठं संकट भारतासमोर घोघावत आहे. नेमकं कोणतं आहे हे संकट? काय धोका असू शकतो भारताला? सविस्तर जाणून घेऊयात.
17 Jun 2026 03:45 PM (IST)
कर्जत : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत मुली शिक्षण घेतात.या शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलींच्या आत्मसन्मान आणि आरोग्य सुरक्षितता यांच्यासाठी खास पिंक रूम बनवण्यात आली आहे.दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प यांच्याकडून राबवण्यात आलेल्या पिंकरूम बद्दल मोठी उत्सुकता राज्यभर निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:40 PM (IST)
पुणे : धायरी परिसरातील एका गोडाऊनमधून चोरट्यांनी ‘ऑर्थोफॉस्फोरिक’ हे अत्यंत महत्वाचे तसेच जीवितास घातक असलेले तब्बल २० लाशांचे अॅसिड चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी गोडाऊनमधून एकाचवेळी २०० कॅन या अॅसिडचे लांबविले आहेत. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:35 PM (IST)
ओडिशा: ओडिशा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ही तलावात आंघोळ करून परतत असतांना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. घडलेली घटना ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील धरूआडीच पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. (Odisa Crime)
17 Jun 2026 03:30 PM (IST)
NCERT Controversy: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) इयत्ता नववीच्या नव्या पाठ्यपुस्तकात सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध ‘डांसिंग गर्ल’ (Dancing Girl) या मूर्तीचा बदललेला फोटो छापण्यात आल्याने इतिहासकार आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय उपखंडातील सर्वात प्रसिद्ध पुरातत्वीय शोधांपैकी एक मानली जाणारी ही मूर्ती हजारो वर्षांच्या कला वारशाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:25 PM (IST)
आयसीसी महिला टी- २० विश्वचषक २०२६ (ICC Womens T20 World Cup 2026) स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर, भारतीय संघ दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया आपला दुसरा सामना आज १७ जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात, स्मृती मंधानाने डावाच्या सुरुवातीला आणि रिचा घोषने खालच्या फळीत चांगली फलंदाजी करून भारताला ६४ धावांनी विजय मिळवून दिला होता. आजचा हा सामना जिंकून भारतीय संघ सेमिफायनसाठी आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी उतरेल. आजच्या या सामन्यात कशी असेल टीम इंडियाची संभाव्या प्लेइंग ११, जाणून घेऊयात.
17 Jun 2026 03:20 PM (IST)
Nasrapur Crime Update: नसरापूर येथे अपहरण करून तिचा विनयभंग आणि अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याने क्रूरतेचा कळस गाठला होता. आरोपीने चिमुकलीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर अत्याचार केले, असा दावा विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मंगळवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात केला. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:15 PM (IST)
Bangladesh Ram statue controversy Gaibandha : बांगलादेशातून हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या धार्मिक अन्यायाची आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. बांगलादेशातील (Bangladesh) उत्तरी भाग असलेल्या गायबांधा (Gaibandha) जिल्ह्यातील पलाशबारी उपजिल्ह्यात स्थित ऐतिहासिक ‘श्री श्री राधा गोविंद आणि काली मंदिर’ परिसरात उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे बांधकाम स्थानिक प्रशासनाने आणि मंदिर समितीने तात्काळ स्थगित केले आहे. हा प्रकल्प केवळ बांगलादेशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील प्रभू रामाच्या सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक मानला जात होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्थानिक इस्लामिक मूलतत्त्ववादी गट आणि संघटनांनी या पुतळ्याच्या उभारणीला हिंसक विरोध दर्शवल्यामुळे अखेर हे काम थांबवण्याची नामुष्की मंदिर समितीवर आली आहे. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:10 PM (IST)
सुनयना सोनवणे /पुणे: भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई वरिष्ठ आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावत देशाचा झेंडा उंचावला. या विजयी भारतीय संघात पुण्याचा २२ वर्षीय खेळाडू धनराज गणेश राऊत याचा समावेश होता. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय संघाच्या विजयात मोलाची भर पडली. वाचा सविस्तर
17 Jun 2026 03:05 PM (IST)
Telegram Moves High Court: NEET-UG 2026 ची फेरपरीक्षा होणार असतानाच, सरकारने ‘टेलिग्राम’ (Telegram) ॲपवर घातलेल्या तात्पुरत्या बंदीविरोधात कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टेलिग्रामने या निर्णयाला आव्हान देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती, जी उच्च न्यायालयाने मान्य केली. विशेष म्हणजे, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) शिफारशीवरून केंद्र सरकारने मंगळवारी टेलिग्रामवर २४ तासांची बंदी घातली होती. वाचा सविस्तर
#BREAKING The Centre’s decision to impose a temporary ban on Telegram ahead of the NEET exam has been challenged in the Delhi High Court. The platform has sought an urgent hearing, and the case is scheduled to be heard today pic.twitter.com/eBhMvtANFt
— IANS (@ians_india) June 17, 2026
17 Jun 2026 02:59 PM (IST)
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले आहे. त्यावर बोलताना पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, शिवसेना फुटीची लढाई अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आता आणखी एक प्रयत्न केला जात आहे. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना खासदार बनवले. जर कोणाचा विश्वास उडाला असेल, तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
17 Jun 2026 02:51 PM (IST)
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, तसंच अरविंद सांवत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनेक खासदारांनी देवांच्या शपथा घेतल्या आणि आता ते बाहेर अज्ञातस्थळी गेल्याचं बोललं जात आहे. शिवाय पैसे घेऊन ते बाहेर गेल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं.
17 Jun 2026 02:41 PM (IST)
तुम्ही आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीने निवडून आले असताना कोणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. मागे जे झाले त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाही, जो राडा व्हायचा तो होईल. खासदार पक्ष सोडून गेले तर आता आम्ही शांत बसणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
17 Jun 2026 02:31 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई संसद भवनात दाखल झाले आहेत. ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षाचे सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
17 Jun 2026 02:20 PM (IST)
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेना यूबीटीचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पत्र दिले. कोणत्याही स्वतंत्र गटाला मान्यता दिली जाऊ शकते. केवळ पक्ष विलीन होऊ शकतो, गट विलीन होऊ शकत नाही, असे पत्रात म्हटल्याचे सावंत यांनी सांगितले.
17 Jun 2026 02:11 PM (IST)
भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मागील आर्थिक वर्षात (२०२५-२६) देशाचे वार्षिक संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पादन मानले जात आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत यामध्ये १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
17 Jun 2026 02:00 PM (IST)
देशांतर्गत आणि परदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च सातत्याने वाढतच चालला आहे. परिणामी, शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक पर्याय बनले आहे. या सगळ्यात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका स्पर्धात्मक व्याजदरांवर शैक्षणिक कर्ज देतात. पण कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर आणि अटींची तुलना करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण व्याजदरांमधील अगदी लहान फरकाचाही दीर्घकाळात एकूण परतफेडीच्या रकमेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बँक नीट निवडणं फार गरजेचं आहे. जून 2026 मध्ये कोणत्या बँक सर्वात कमी व्याजदर देताहेत? जाणून घेऊयात.
17 Jun 2026 01:55 PM (IST)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा सामना आज लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. १. ३० वाजता सामन्याला सुरुवात होईल त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रिन्स यादवला पदार्पणाची संधी देण्यात आली.
17 Jun 2026 01:50 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोगोबाबा टेकडी परिसरात एका २७ वर्षीय शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुर्गम ठिकाणी मृतदेह असल्याने पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकाने सुमारे दोन किलोमीटरचा डोंगराळ मार्ग पार करून मृतदेह स्ट्रेचरवरून खाली आणला. आत्महत्या करणारी शिक्षिका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षिका बनली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
17 Jun 2026 01:45 PM (IST)
सध्या जगभरात प्रचंड महागाईचा भडका उडाला आहे. जग अनेक आघाड्यांवर युद्ध लढत असून सर्वत्र दैनंदिन जीवनातील वस्तू देखील महागल्या आहे. त्यात इराण युद्धामुळे तर होर्मुझचा व्यापारी वाहतूकीचा समुद्री मार्ग बंद झाल्याने इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. कच्चा तेलाचा पुरवठा जागतिक स्तरावर अपुरा पडत असून पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीच अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने थेट गायीच्या शेणापासून विमानाचे इंधन तयार केले आहे. ज्याचा जगभरातील देशांच्या हवाई कंपन्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
17 Jun 2026 01:35 PM (IST)
फेब्रुवारीमध्ये सुरू झालेले इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता संपलं आहे. पण जितकं सहज बोलतो तितकं सहज हे युद्ध संपलेलं नाही. त्या देशांसह इतर देशांवरही किंबहून जागतिक स्तरावरही अवघ्या काही महिन्यांत गंभीर परिणाम झाले आहे. परिणामी, भारताला तेल आणि वायूच्या तुटवड्याचा सामना करावा लागला, तसेच रुपयाही कमकुवत झाला. रुपया कमकुवत होत असताना डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे जनतेसमोरही मोठी समस्या निर्माण झाली त्याचं सगळ्यात मोठं स्वरुप ते म्हणजे महागाई. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी सरकार आता तगडा प्लॅन बनवत आहे.
17 Jun 2026 01:25 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत दगाबाजी खासदारांना चांगलेच सुनावले आहे.
17 Jun 2026 01:15 PM (IST)
‘ज्यांना विद्यार्थी, शिक्षण, रोजगार याबद्दल तळमळ नाही, कळत नाही असे अशिक्षित सरकार आम्हाला नको आहे’ या शब्दात केंद्र सरकारचा निषेध करीत मंगळवारी हजारों कॉकरोच संतापले. जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मोदी सरकारलाही धारेवर धरले. इतर राजकीय पक्षांवरही टीकेची झोड उठविली. आंदोलनाने एकप्रकारे नागपुरातही जेन-झी अवतरल्याचे चित्र नागपूरकरांनी अनुभवले.
17 Jun 2026 01:05 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणातून आणि मध्यपूर्वेतील (Middle East) घडामोडींमधून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत ज्या अमेरिकेच्या बळावर इस्रायल संपूर्ण मध्यपूर्वेत युद्ध लढत होता, त्याच अमेरिकेने आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांना मोठा दणका दिला आहे. गेल्या ४८ तासांत अमेरिकेने घेतलेल्या लागोपाठच्या निर्णयांमुळे इस्रायल जागतिक स्तरावर पूर्णपणे एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट शब्दांत इस्रायलवर टीका केली असून, या ऐतिहासिक बदलणाऱ्या भूमिकेमुळे नेतान्याहू यांच्यासमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत.
17 Jun 2026 12:50 PM (IST)
मध्य रेल्वेवरील अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावरील वारंवार होणारे अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी विशेष ‘झिरो डेथ’ अभियान सुरू केले आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडताना होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेषतः अंबरनाथजवळील मोरीवली गाव परिसर हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असून, येथे आतापर्यंत तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे.
17 Jun 2026 12:50 PM (IST)
देशाची खरी आर्थिक स्थिती आणि विश्वासार्ह आकडेवारी जनतेसमोर येत नसल्याने अर्थव्यवस्थेचे अचूक विश्लेषण व योग्य धोरणनिर्मिती अशक्य होत असल्याची टीका भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. केंद्र सरकारकडून सादर केली जाणारी आर्थिक आकडेवारी दिशाभूल करणारी असून, देशाचा वास्तविक विकासदर (GDP) ७.७ टक्के नसून, केवळ २.७ टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा त्यांनी केला.
17 Jun 2026 12:40 PM (IST)
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या गावी पत्नीच्या नावावर जमीन खरेदी करणे एका पतीला आणि त्यांच्या कुटुंबियांना इतके खटकले की, त्यावरून पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केली. ही मारहाण एवढी अमानुष होती की पत्नीचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
17 Jun 2026 12:35 PM (IST)
मध्य पूर्वेतील युद्ध संपले असून, अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला आहे. या करारानुसार, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाच्या तेल आणि वायूच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या महत्त्वपूर्ण सागरी मार्गावरील अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी उठवली. याचे परिणाम आताच दिसू लागले आहेत; जवळपास दोन महिन्यांच्या नाकेबंदीनंतर, आता इराणचे कच्चे तेल जहाजांवर चढवले जात आहे.
17 Jun 2026 12:30 PM (IST)
फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित जी-७ (G7) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताने जागतिक स्तरावर आपली धोरणात्मक आणि आर्थिक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (१६ जून २०२६) जगातील तीन प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी स्वतंत्र आणि अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठका घेतल्या.
17 Jun 2026 12:20 PM (IST)
पाठीशी संख्याबळ मोठे असतांनाही अंतर्गत नाराजी व दगाफटक्याच्या भितीने महायुतीकडून सावध पावले टाकली जात असतांना निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर महाविकासने आपले पत्ते उघड केले आहेत. महायुतीचा अधिकृत उमेदवार हा आमचा विरोधी उमेदवार असेल असे सांगून रात्रीपर्यंत महाविकासची भूमिका मुंबईतून निश्चित होईल असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. महाविकाच्या या अधिकृत भूमिकेवरून विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी पडद्याआड काहीतरी हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, काहींनी प्रतिनिधींमार्फत तर काहींनी मध्यस्थांमार्फत संपर्क साधल्याचा दावाही महाविकासच्या नेत्यांनी केला आहे.
17 Jun 2026 12:00 PM (IST)
पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो भाविक आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते (दि.१७) दुपारी ३:३० वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल.
17 Jun 2026 11:50 AM (IST)
सकाळच्या चहाच्या कपातून ताजेपणा नव्हे तर रासायनिक भेसळ पोटात जात असल्याचे धक्कादायक वास्तव अंधेरीत उघड झाले आहे. चहा अधिक आकर्षक दिसावा यासाठी त्यात रंग मिसळून विक्रीसाठी तयार केला जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत समोर आला. या कारवाईत ९०० किलो चहा पावडर आणि १७ किलो संशयित रंगासह तब्बल २.१८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
17 Jun 2026 11:45 AM (IST)
मंगळवारपाासून (१६ जून) फ्रान्सच्या एव्हियान येथे G7 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. या व्यासपीठावर भारतासह अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपान, कॅनडा आणि जर्मनी या देशांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. तसेच इतर काही नेत्यांशी चर्चाही केली. या व्यासपीठावरुन पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मेलोडी यांची केमिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे.
17 Jun 2026 11:40 AM (IST)
दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या समस्येवर पालिकेने योजना आखली आहे. यानुसार मध्य आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्स आणि पाणी उपसा करणाऱ्या आउटफॉल्सच्या ठिकाणी कचरा अडकणे टाळण्यासाठी पालिकेने गॅल्व्हनाइज्ड एम.एस. स्क्रीन बसवण्याचे काम प्रत्यक्ष मैदानात युद्धपातळीवर सुरू केले आहे. तर पावसाळा तोंडावर असल्याने पर्जन्यजल वाहिन्या विभागाकडून दिवस-रात्र हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
17 Jun 2026 11:30 AM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जी-७ (G7) शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभावी मुत्सद्देगिरीची छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक संबंधांबाबत भारताची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारताचे परराष्ट्र धोरण आणि जागतिक पावले ही नेहमीच ‘मानवता प्रथम’ (Humanity First) या महान तत्त्वावर आधारित राहिली आहेत. केवळ कोरड्या चर्चा न करता भारताने हे तत्त्व प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. भारताच्या पुढाकाराने सुरू झालेले आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (International Solar Alliance – ISA), आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची आघाडी (CDRI), जागतिक जैवइंधन आघाडी (Global Biofuels Alliance), ‘मिशन लाइफ’ (Mission LiFE) आणि पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेली ‘एक पेड माँ के नाम’ ही मोहीम या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी हाच मानवी कल्याणाचा विचार आहे, याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले.
17 Jun 2026 11:20 AM (IST)
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी त्यांच्या ग्लोबल एज्युकेशन प्रोग्रामच्या चौथ्या बॅचसाठी अर्ज मागवले आहेत. या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा कार्यक्रम श्री. बी. प्रभाकरन यांच्या गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या विविध उपक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामुळे या भागातील २४ विद्यार्थी आधीच ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत.
17 Jun 2026 11:11 AM (IST)
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अनैतिक संबंधांच्या संशयातून 27 वर्षीय युवराज व्यवहारे यांची मध्यरात्री चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. घरासमोरील अंगणात झोपलेल्या युवराजवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत चार आरोपींना अटक केली आहे.
17 Jun 2026 10:51 AM (IST)
२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम (Telegram) ॲपवर लावलेली तात्पुरती बंदी सध्या जोरदार चर्चेत आहे. परीक्षेच्या संदर्भातील खोट्या अफवा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, टेलिग्रामला ३० जून २०२६ पर्यंत त्यांचे ‘मैसेज एडिट फीचर’ (Message Edit Feature) देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून आधीच पाठवलेले संदेश एडिट करून संभ्रम पसरवता येणार नाही.
17 Jun 2026 10:41 AM (IST)
फ्रान्सच्या बियारित्झमध्ये G7 परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. दरम्यान या जागतिक व्यासपीठावरुन ट्रम्प यांनी थेट इस्रायलवर निशाणा साधला. त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांवर तीव्र संताप व्यक्क केला. तसेच अमेरिकेमुळे इस्रायलचे अस्तित्व नसल्याचे म्हटले.






