खासदार राघव चड्ढांना सोडवेना सरकारी बंगला; सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव

आम आदमी पार्टीचे (AAP) पंजाबमधील राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांना पटियाला हाऊस कोर्टाने सरकारी बंगला रिकामा न केल्यामुळे न्यायालयाने सुनावले होते. राज्यसभा सचिवालयाने चड्ढा यांना दिलेला टाईप 7 बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते.

    नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (AAP) पंजाबमधील राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांना पटियाला हाऊस कोर्टाने सरकारी बंगला रिकामा न केल्यामुळे न्यायालयाने सुनावले होते. राज्यसभा सचिवालयाने चड्ढा यांना दिलेला टाईप 7 बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, राघव चड्ढा यांनी हा बंगला रिकामा करण्यास विरोध दर्शवत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    नियमानुसार, राघव चड्ढा यांना टाईप 5 किंवा टाईप ६ बंगल्यात राहण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यांना टाईप 7 बंगला देण्यात आला आहे. त्यामुळे सचिवालयाने त्यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर राघव चड्ढा यांनी पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. पटियाला हाऊस कोर्टानेही राघव चड्डा यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर चड्ढा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    राघव चड्ढा यांच्या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. राज्यसभा सचिवालयाने राघव चड्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते. परंतु. बंगला रिकामा करण्याऐवजी खासदार चड्ढा पटियाला हाऊस कोर्टात पोहोचले. राघव चड्ढा यांनी याचिका दाखल केल्यानंतर याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टात गेल्या आठवड्यात 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.

    यावेळी पटियाला हाऊस कोर्टाने सचिवालयाच्या बाजूने निकाल दिला. राज्यसभा सचिवालयाने राघव चड्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे जे आदेश दिले होते, त्यावर कनिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली होती.