Rahul Gandhi Patna Live: ” केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग फक्त तुमची मते चोरत नाहीयेत, हे तुमचे राशन, तुमच्या जमिनी चोरतील आणि अदानी अंबानींना देतील. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्ती या संविधानाची हत्या करण्यचाा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही त्यांना संविधानाची हत्या करू देणार नाही.” अशा शब्दांत खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा आज शेवटचा दिवस असून बिहारमधील पटना येथे यात्रेच्या सांगता सभेत ते बोलत आहेत.
राहुल यांच्या बिहारमधील ‘मतदार हक्क यात्रे’चा आज पाटणा येथे समारोप होत आहे. पदयात्रेसाठी राहुल गांधी, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, अशोक गेहलोत यांच्यासह विरोधकांचे अनेक मोठे चेहरे गांधी मैदानात उपस्थित आहेत. गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा ४ किमी अंतरावर पाटणा उच्च न्यायालयातील आंबेडकर पुतळ्याजवळ संपेल. या पदयात्रेला ‘गांधी से आंबेडकर’ असे नाव देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले आहेत. ” ही यात्रा बिहारमध्ये सुरू झाली, वोटर अधिकार यात्रा या नावाने ही यात्रा सुरू झाली. महाराष्ट्रात,एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणूक चोरली गेली, हे १०० टक्के खर आहे. तब्बल १ कोटी नवे मतदार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, वाढवण्यात आले. नवे मतदार येऊन मतदान केले. जितकी मते आम्हाला लोकसभा निवडणुकीत मिळाली, त्यातले एकही मतदान कमी झाले नाही, पण सर्वच्या सर्व नवी मते भाजप महायुतीला मिळाली, लोकसभा आम्ही जिंकलो, विधानसभेला आमचे तीनही मजबूत पक्ष साफ झाले.
असं का झालं, कारण निवडणूक आयोगाने आणि भाजपने मिळून मतदान चोरी केली. त्यानतंर आम्ही कर्नाटकातील महादेवपुरा आणि बंगलोर सेंट्रल च्या जागेवर एका मतदार संघात १ लाखापेक्षा जास्त बोगस मतदान होते. बंगलोर सेंट्रलमध्ये ७ मतदारसंघ येतात. त्यातील ६ मध्ये आमचा विजय झाला. जिथे १ लाख बोगस मतदार होते तिथे आमची हार होते. आणि त्याच मतदारसंघामुळे भाजप लोकसभा निवडणूक जिंकते.
Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची
आम्ही हेच पत्रकार परिषदेत डेटासहित दाखवले, पण निवडणूक आयोगाने आम्हाला मतदार याद्या दिल्या नाहीत. व्हिडीओग्राफी दिली नाही, आमच्या लोकांनी नावे, फोटो, पत्ते जुळवून हे काम केलं. ४ महिने लागले, १७-१८ तास त्यांनी कामे केली. त्यानंतर आम्ही देशासमोर हा सर्वात मोठा पुरावा सादर केला. बिहारच्या युवकांना माझं म्हणणं आहे. आम्ही सादर केलेले मतदान चोरीचे पुरावे खरे आहेत आणि मतचोरी म्हणजे तुमच्या अधिकारांची चोरी. वोटचोरी म्हणजे, तुमच्या आरक्षण चोरी, वोटचोरी म्हणजे रोजगारांची चोरी, वोटचोरी म्हणजे शिक्षेची चोरी, लोकशाहीची चोरी, देशातील तरुण पिढीच्या भविष्याची चोरी.