1. जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी
2. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक
3. मराठा आंदोलनाविरुद्ध हायकोर्टात अनेक याचिका दाखल
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले आहेत. त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आजपासून जरांगे पाटील यांनी कडक उपोषण सुरू केला आहे. त्यांनी आजपासून पाणी पिणे देखील सोडले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात अनेक याचिका करण्यात आल्या आहेत. आज कोर्टाला सुट्टी असून देखील आज तातडीची सुनावणी घेतली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आले आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. आज हायकोर्टाला सुट्टी असून देखील या प्रकरणावर तातडीने सुनावणी सुरू आहे. यावेळो हायकोर्टाने सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.
महाधिवक्ता कोर्टात काय म्हणाले?
हायकोर्टाच्या आदेशांचे मनोज जरांगे पाटलांकडून उल्लंघन झाले आहे. आंदोलकांचे उद्देश अजून स्पष्ट होत नाहीये. आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही. व्हीडिओद्वारे धमकावण्यात येत आहेत. असेच सुरू राहिले तर कायद्याचे राज्य राहू शकत नाही. या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत. सर्व नियमांचे पालन करण्याची हमी जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र आंदोलकांनी नियमांचे पालन केले नाही. पोलिस संयम बाळगून आहेत, बळाचा वापर केलेला नाही. तुम्ही निर्देश द्यावेत, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू.
गुणरत्न सदावर्ते कोर्टात काय म्हणाले?
गेल्या वेळेस माझ्या तक्रारीमुळेच आंदोलकांना वाशीतच रोखले गेले. तक्रार केली मात्र पोलिसांकडून कारवाई नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाचा नसल्याने हे आंदोलन केले आहेत. आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे. आंदोलनकर्ते शिवीगाळ करत आहेत. मराठा संघटनांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे.
जरांगेंच्या मागण्या आणि फडणवीसांचे प्रत्युत्तर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तपाले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा चौथा दिवस सुरु केला. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागणीवर आणि त्यांच्या टीकेवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहेत.”कितीही शिव्या दिल्या, उपहास केला तरी मी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाणार नाही,” असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.