काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील सुरक्षा भंगाबाबत दावा केला होता की, सभागृहात ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित भाजप खासदारांनी पळ काढला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे.146 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने निदर्शने केली. येथे राहुल गांधी म्हणाले की, काही तरुणांनी संसदेत घुसून स्मोक कॅनमधून धूर सोडला. हे पाहून भाजप खासदारांची पळापळ झाली. भाजपचे सर्व खासदार पळून गेले. भीतीने त्यांची घाबरगुंडी उडालेली.
खुद्द राहुल गांधी पाठ करून पळून गेले
भाजप नेते जगदंबिका पाल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर पलटवार करत राहुल गांधी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे. सार्वजनिक जीवनात नेता होण्यासाठीते योग्य नाही. ज्या ठिकाणी दोन्ही आरोपींनी संसदेत उडी मारली होती, तिथे फक्त भाजप खासदार आसनस्थ होते. आम्हीच त्याला पकडले. तेथे काँग्रेसचे लोकही दिसत नव्हते. आमच्या पक्षाची माणसे निधड्या छातीने उभे होते. आम्हीच त्यांना पकडले. तिथे काँग्रेसचा एकही खासदार नव्हता. खुद्द राहुल गांधींनी पाठ फिरवून पळ काढला होता.
पाल म्हणालया की, काँग्रेसने या घटनेचे राजकारण केले आहे. काँग्रेसने प्रथमच सर्व मर्यादा मोडल्या आहेत. त्यांनी सभागृहात विरोध केला, सभापतींचा अवमान केला. त्यांनी देशाला लाजवले आहे.
काय म्हणाले राहुल ?
काही तरुणांनी संसदेत घुसून पांढरा धूर सोडल्याचे राहुल गांधी यांनी जंतरमंतर येथे सांगितले होते. हे पाहून भाजप खासदारांची पळापळ झाली. भाजपचे सर्व खासदार पळून गेले. पुढे ते म्हणाले की, 13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याने घुसखोरांनी असे पाऊल का उचलले, असे काही प्रश्न उपस्थित होतआहेत. या घटनेमुळे सुरक्षेचा भंग झाल्याचा प्रश्न आहे, पण त्यांनी अशा प्रकारे आंदोलन का केले, असाही प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. प्रश्न खरे तर देशातील बेरोजगारीचा आहे, असे त्यांनी नमूद केले.






