ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल
Rahul Gandhi dual citizenship Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत वाद पुन्हा उफाळला असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) नेहमीच राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करत आला आहे, आणि आता हा मुद्दा थेट न्यायालयात पोहोचला आहे. जर राहुल गांधींवर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले, तर त्यांना भारतीय नागरिकत्व गमवावे लागू शकते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला आदेश दिला आहे की, त्यांनी या प्रकरणावर चार आठवड्यांत निर्णय घ्यावा. यावर केंद्र सरकारने आठ आठवड्यांची मुदत मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना मर्यादित कालावधी दिला आहे. परिणामी, या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या धमक्यांना इराणचे कडवे उत्तर! भूमिगत मिसाईल शहराचा धक्कादायक VIDEO झाला व्हायरल
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता एस. विघ्नेश शिशिर यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, राहुल गांधींनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिशिर यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे याबाबत नवीन पुरावे आहेत, ज्यात यूके सरकारकडून प्राप्त दस्तऐवज आणि ईमेल्सचा समावेश आहे. या आधीही, सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २००३ मध्ये युनायटेड किंगडममध्ये ‘बॅकअप्स लिमिटेड’ नावाची कंपनी नोंदणीकृत केली होती, जिचे संचालक आणि सचिव राहुल गांधी होते, असा दावा केला होता. कंपनीच्या २००५ आणि २००६ च्या वार्षिक अहवालांमध्ये राहुल गांधी यांचे राष्ट्रीयत्व ‘ब्रिटिश’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. याच कारणामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुहेरी नागरिकत्व म्हणजे एकाच वेळी दोन किंवा अधिक देशांचे नागरिकत्व असणे. यामुळे संबंधित व्यक्तीला दोन्ही देशांचे पासपोर्ट ठेवण्याची आणि त्या देशांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याची मुभा मिळते.
भारतीय संविधानाच्या कलम ९ नुसार, भारतात दुहेरी नागरिकत्वाला मान्यता नाही. जर कोणत्याही व्यक्तीने परदेशी नागरिकत्व स्वीकारले, तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. तसेच, भारतीय पासपोर्ट कायदा, १९६७ नुसार, परदेशी नागरिकत्व घेतल्यानंतर भारतीय पासपोर्ट वापरणे हा गुन्हा मानला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता संपूर्ण जगाचे इंटरनेट कनेक्शन जाणार ड्रॅगनच्या ताब्यात; चिनी शास्त्रज्ञांनी तयार केले ‘डीप सी’ केबल कटर
जर राहुल गांधींवरील आरोप सिद्ध झाले, तर त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.